व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सभासद शेतकऱ्यांना ३ हजार १५४ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप

वाढलेला उत्पादन खर्च, गतवर्षी झालेली अतिवृष्टी आणि पीक नुकसानीमुळे कर्जाकडे कल वाढल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 12, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
maharashtra Govt decision Big relief for farmers stamp duty waiver for crop loans up to Rs 2 lakh

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) २०२५-२६ या हंगामात उद्दिष्टापेक्षा अधिक पीक कर्जवाटप करत तीन लाख १५ हजार २४६ शेतकरी सभासदांना तब्बल तीन हजार १५४ कोटी ७ लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. खरीप आणि रब्बी हंगाम मिळून बँकेने ११४.५२ टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे.

Novel NIBR Ads

वाढलेला उत्पादन खर्च, गतवर्षी झालेली अतिवृष्टी आणि पीक नुकसानीमुळे कर्जाकडे कल वाढल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बँकेकडून तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीक कर्ज दिले जाते. तर तीन लाखांहून अधिक पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अकरा टक्के व्याजदर आकारण्यात येतो.

पीडीसीसी बँकेच्या पीक कर्जवाटपाच्या आकडेवारीनुसार खरिपासाठी दोन लाख ३९ हजार १७० सभासदांना दोन हजार ४९० कोटी १८ लाख ७२ हजार रुपयांचे कर्ज वितरित केले. खरिपात उद्दिष्टपूर्तीचे प्रमाण १२०.६० टक्क्यांवर पोहोचले. तर रब्बीमध्ये ७६ हजार ७६ सभासदांना ६६३ कोटी ८९ लाख ३ हजार रुपयांचे कर्जवाटप केले.

रब्बीत उद्दिष्टपूर्तीचे प्रमाण ९६.३१ टक्के इतके राहिले. शिरूर तालुक्यात सर्वाधिक ४५३ कोटी ४६ लाख ९३ हजार रुपयांचे कर्ज वितरित केले. त्याखालोखाल जुन्नरमध्ये ४२२ कोटी ८३ लाख ८७ हजार रुपये, इंदापूरमध्ये ३८२ कोटी १८ लाख ५५ हजार, दौंडमध्ये ३४३ कोटी ५४ लाख ५८ हजार आणि बारामतीत ३२९ कोटी ६३ लाख १३ हजार रुपयांचे कर्ज वाटप झाले.

याबाबत पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे म्हणाले की, पीककर्जाची मागणी ज्याप्रमाणात होईल, तेवढे बँकेकडून कर्जवाटप केले जात आहे. उद्दिष्टाहून अधिक कर्ज वाटप केले आहे. कुठलीही अडचण येऊ दिली जाणार नाही. तशी तरतूद करण्यात आलेली आहे.

Novel NIBR Ads

कर्ज वाटप (आकडेवारी लाख रुपयांमध्ये)
एकूण कर्जवाटप- ३१५४०७.७५
खरीप कर्जवाटप- २४९०१८.७२
रब्बी कर्जवाटप- ६६३८९.०३

तालुकानिहाय कर्जवाटप रक्कम
तालुका – एकूण कर्जवाटप (लाख रुपयांमध्ये)
1. आंबेगाव – २६९४५.११
2. बारामती – ३२९६३.१३
3. भोर – १२९४४.८६
4. दौंड – ३४३५४.५८
5. हवेली – १०१४३.१९
6. इंदापूर – ३८२१८.५५
7. जुन्नर – ४२२८३.८७
8. खेड – ३२४३७.१५
9. मावळ – ७१३५.२२
10. मुळशी – ५१७३.४९
11. पुरंदर – २५०९४.४६
12. शिरूर – ४५३४६.९३
13. राजगड – २३६७.२२

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना शिक्षण संकुलात दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी ; वारु येथील अबोली निंबळे ९६ टक्के गुणांसह केंद्रात व शाळेत प्रथम
– तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा
– इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार
– विद्यार्थ्यांना इस्रोसह अमेरिकेतील नासा केंद्राला भेटीची मिळणार संधी ; ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाला शासनाची मान्यता


dainik maval jahirat

Previous Post

अलिशान कारमधून गांजा घेऊन जात असलेल्या आरोपीस उर्से टोल प्लाझा येथून घेतले ताब्यात

Next Post

तळेगाव शहरातील स्टेशन परिसरातील जोशीवाडी, ठाकरवस्ती येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Bhumi Pujan of development works at Joshiwadi Thakarvasti in station area of ​​Talegaon Dabhade

तळेगाव शहरातील स्टेशन परिसरातील जोशीवाडी, ठाकरवस्ती येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Teachers

दिलासादायक निर्णय! ग्रामीण व दुर्गम भागात इयत्ता नववी-दहावीच्या वर्गांची एकत्रित पटसंख्या २० असेल तरीही मिळणार तीन शिक्षक

June 28, 2026
Threatening of journalists by public representatives will not be tolerated Maval Taluka Marathi Journalists' Association

लोकप्रतिनिधींकडून पत्रकारांना धमकावणे खपवून घेणार नाही ; मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रशासनाला निवेदन

June 28, 2026
Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

आमदार सुनील शेळके यांच्या मागणीला यश ; केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश

June 28, 2026
Approval granted for permanent pictorial postal cancellation mark for Shrimant Mahadji Shinde Memorial Vadgaon Maval

वडगावच्या ऐतिहासिक वारशाचा राष्ट्रीय सन्मान ! श्रीमंत महादजी शिंदे स्मारकास कायमस्वरूपी चित्रमय टपाल शिक्क्यास मान्यता

June 27, 2026
Cancel the Pavana closed water channel project permanently

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत ३ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

June 27, 2026
MNS submits memorandum to Public Works Department regarding incomplete work on Karla Phata–Malavli road

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात ‘मनसे’चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; आंदोलनाचा इशारा

June 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.