Dainik Maval News : अतिवृष्टीमुळे तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील म्हाळुंगे पोलीस ठाण्याजवळील जुन्या पुलाचा भराव खचल्याने हा पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुचनेनुसार पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने या पुलावरील सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक १४ जुलैपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी ही अधिसूचना जारी केली आहे. चाकण, तळवडे व महिंद्राकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एच.पी. चौक, इंड्युरन्स चौक, सिग्मा, व्ही.डब्ल्यू. कॉर्नर, एआर-एआय चौक, स्पायसर चौक तसेच महिंद्रा सर्कल मार्गे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच चाकणहून येणाऱ्या वाहनांसाठी वाघजाईनगर, बिरदवाडी चौक आणि म्हाळुंगे गाव कमान-आंबेठाण मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. वाहनचालकांनी सहकार्य करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
– पाटण (ता. मावळ) दरड दुर्घटना । ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकाचा मृत्यू, अन्य दोघांचा शोध सुरू
– पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प मावळातील शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
