व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा पोलिसांची मोठी कामगिरी ; २.२९ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त, आरोपीला कल्याणमधून अटक

लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये २५ जुलै २०२६ रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 7, 2026
in लोकल, शहर
Major achievement by Lonavala Police Stolen property seized accused arrested from Kalyan

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा शहर पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल व्यवहारांच्या आधारे चोरीचा गुन्हा उघडकीस आणत २ लाख २९ हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी हरिदास बाबू कोळेकर (रा. मानपाडा, कल्याण, मुंबई) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीतील मौल्यवान वस्तूंसह गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.

लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये २५ जुलै २०२६ रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन तसेच Google Pay व्यवहारांची सखोल पडताळणी केली. याच तपासातून आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.

तपासादरम्यान आरोपी हरिदास बाबू कोळेकर हा कल्याणमधील मानपाडा परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने मानपाडा येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

आरोपीची चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून एचपी कंपनीचा लॅपटॉप, दोन अॅपल मोबाईल फोन, अॅपल स्मार्ट वॉच, अॅपल एअरपॉड्स, रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली होंडा शाइन दुचाकी (एमएच-०३-एफजी-३३४९) असा एकूण २ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजन गवस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक देवरे, पोलीस हवालदार संदीप पाडळे, पोलीस शिपाई गणेश कोद्रे आणि हेमांग अय्यर कोकाटे यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद
– उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप; मावळमधील ४५ अधिकाऱ्यांना लॅपटॉप
– ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं


dainik maval jahirat

Previous Post

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

Next Post

तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका ! मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Setback for NCP in Talegaon Dabhade city Majnu Natekar councilor membership cancelled

तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका ! मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP protests in Talegaon Dabhade against alleged remarks made about DCM Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अपमानास्पद वक्तव्याचा तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

August 7, 2026
Setback for NCP in Talegaon Dabhade city Majnu Natekar councilor membership cancelled

तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका ! मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द

August 7, 2026
Major achievement by Lonavala Police Stolen property seized accused arrested from Kalyan

लोणावळा पोलिसांची मोठी कामगिरी ; २.२९ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त, आरोपीला कल्याणमधून अटक

August 7, 2026
Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.