Dainik Maval News : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना (दि. ९ ऑगस्ट) गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, शुभम रमाकांत शर्मा (वय 23 वर्ष, रा. श्रमदान नगर, कुसगाव बुद्रुक ता. मावळ) हा आयआरबी ऑफिस कुसगाव बुद्रुक येथे त्याच्या ताब्यात कारमध्ये गांजा विक्री करीत आहे.
सदर माहिती मिळाल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून शिताफीने त्यास ताब्यात घेऊन त्याची आणि त्याचे ताब्यातील सेंट्रो कारची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या ताब्यात 4 लाख 25 हजार रुपये किमतीचा 8 किलो 500 ग्रॅम गांजा, यासह 3 लाखाची (क्र. MH14/BK7235) कार असा एकूण 7 लाख 25 हजार रु. किमतीचा मुद्देमाल मिळून आला. आरोपी विरुद्ध NDPS अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उप विभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित सावंत, म्हेत्रे मॅडम, पोलीस हवालदार गणेश होळकर, संतोष शेळके, तुषार भोईटे, सागर नामदास, राजू मोमीन, सिद्धेश पाटील, पुष्पा घुगे, पो कॉ वाडेकर यांच्िया पथकाने केली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना बंद जलवाहिनी विरोधात हुतात्म्यांचे बलिदान आजही संघर्षाची प्रेरणा ; शिवसेना मावळ परिवाराकडून आदरांजली
– मावळ तालुक्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात ; भव्य बाईक रॅली, आदिवासी पारंपारिक नृत्य ठरले आकर्षण
– ३५ दिवसांच्या प्रवासानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूगावात परतली ; भाविकांकडून उत्साहात स्वागत
