व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना बंद जलवाहिनी विरोधात हुतात्म्यांचे बलिदान आजही संघर्षाची प्रेरणा ; शिवसेना मावळ परिवाराकडून आदरांजली

मावळच्या पाणीप्रश्नासाठी संघर्ष करणाऱ्या या हुतात्म्यांचे बलिदान विसरता येणार नाही, अशी भावना उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 10, 2026
in लोकल, ग्रामीण, शहर
sacrifice of martyrs who opposed Pavana closed pipeline remains an inspiration for ongoing struggle

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधातील आंदोलनात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्व. कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे आणि शामराव तुपे यांच्या स्मृतींना शिवसेना मावळ तालुक्याच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आयोजित करण्यात आलेल्या या अभिवादन कार्यक्रमात शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पवना धरणातील पाणी बंदिस्त जलवाहिनीद्वारे पिंपरी-चिंचवडकडे नेण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी मावळातील शेतकरी आणि नागरिकांनी उभारलेल्या आंदोलनाला मोठा इतिहास आहे. या आंदोलनादरम्यान कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे आणि शामराव तुपे यांनी प्राण गमावले. त्यांच्या बलिदानाची आठवण कायम ठेवत शिवसेना मावळ तालुक्याच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी हुतात्म्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. मावळच्या पाणीप्रश्नासाठी संघर्ष करणाऱ्या या हुतात्म्यांचे बलिदान विसरता येणार नाही, अशी भावना उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केली.

याप्रसंगी माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, ज्येष्ठ शिवसैनिक विलास मुन्हे, विभागप्रमुख सदानंद भोसले, माजी विभागप्रमुख सुनील इंगुळकर, वाहतूक सेनेचे पुणे तालुकाध्यक्ष अवधूत चव्हाण, सतीश गरुड, तालुका संघटक दिनेश वीर, माजी उपतालुका प्रमुख कैलास सगळे, माजी सरपंच अनिल भालेराव, पवन मावळ विभागप्रमुख सुरेश गुप्ता, कार्यालयप्रमुख सनी मोहिते, शाखाप्रमुख उमेश ठाकर, दत्ताभाऊ दाभाडे, विभाग संघटक अंकुश वाघमारे, लहू जाधव, सदानंद पिल्लाने, युवा सेनेचे सतीश गोनते यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पवना धरणातील पाणी, मावळातील शेती आणि नागरिकांच्या पाणीहक्काशी संबंधित प्रश्नांमध्ये हुतात्म्यांचे बलिदान आजही संघर्षाची प्रेरणा देत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अपमानास्पद वक्तव्याचा तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध
– तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका ! मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द
– पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?


dainik maval jahirat

Previous Post

३५ दिवसांच्या प्रवासानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूगावात परतली ; भाविकांकडून उत्साहात स्वागत

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

sacrifice of martyrs who opposed Pavana closed pipeline remains an inspiration for ongoing struggle

पवना बंद जलवाहिनी विरोधात हुतात्म्यांचे बलिदान आजही संघर्षाची प्रेरणा ; शिवसेना मावळ परिवाराकडून आदरांजली

August 10, 2026
Ashadhi Wari Sant Tukaram Maharaj Palkhi returned to Dehu village

३५ दिवसांच्या प्रवासानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूगावात परतली ; भाविकांकडून उत्साहात स्वागत

August 10, 2026
Issue of Patan landslide victims raised directly with Minister girish mahajan through Bala Bhegade initiative

पाटण दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर ; बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने बाधितांना त्वरित मदत, सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रशासनाला निवेदन

August 7, 2026
Vadgaon Maval Demand for installation of CCTV cameras an open gym at Morya Chowk in Dhorewada

वडगाव मावळ : ढोरेवाडा येथील मोरया चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि ओपन जीम उभारण्याची मागणी

August 7, 2026
NCP protests in Talegaon Dabhade against alleged remarks made about DCM Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अपमानास्पद वक्तव्याचा तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

August 7, 2026
Setback for NCP in Talegaon Dabhade city Majnu Natekar councilor membership cancelled

तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका ! मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द

August 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.