Dainik Maval News : राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांच्याबाबत काँग्रेस पक्षातील काही नेत्यांनी कथितरीत्या केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शुक्रवारी जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.
तळेगाव–चाकण रोडवर झालेल्या या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांनी महिलांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत, महिलांबाबत अवमानकारक भाषा किंवा वक्तव्य कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नसल्याची भूमिका व्यक्त केली.
आंदोलनादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनाचे आयोजन तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सुरेश धोत्रे, सभापती सुदाम शेळके, पक्षप्रतोद सत्यम खांडगे, शिवाजी आगळे, सुरेश चौधरी आणि महिला शहराध्यक्षा शैलेजा काळोखे यांनी केले.
यावेळी नगरसेविका संगीता खळदे, आशा भेगडे, मनीषा म्हाळसकर, सोनाली दरेकर, भारती धोत्रे, कमल टकले तसेच मजनू नाटेकर, आमिर मुलाणी, स्नेहा खांडगे, अश्विनी शेळके, अशोक भेगडे, उमेश महाजन, प्रिया मोडक, प्रेरणा ठाकर, उज्वला जाधव, सानिका सांवत, पायल पवार यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व नागरिक उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद
– उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप; मावळमधील ४५ अधिकाऱ्यांना लॅपटॉप
– ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं
