Dainik Maval News : संभाव्य पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने शुक्रवार (दि. २३ ऑक्टोबर) पासून वडगाव मावळ शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा अबोली ढोरे, उपनगराध्यक्ष सुनील ढोरे आणि मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली.
दुष्काळाशी लढा देण्यासाठी आजच पाण्याची बचत करण्याची आवश्यकता असल्याने नगरपंचायतीच्या वतीने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नागरिकांनी नळाला गळती असल्यास ती त्वरित दुरुस्त करून घ्यावी. टाकी अथवा हौद भरताना ओव्हर फ्लो टाळावा. वाहने व अंगण धुण्यासाठी पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा. शहरातील सर्व नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. अंघोळ, कपडे, भांडी धुण्यासाठी आवश्यक तेवढेच पाणी वापरावे व पाण्याची बचत करून नगरपंचायत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– आई व मुलीच्या बचावाचा थरार !! टायगर पॉइंट येथे दरीत पडलेल्या माय लेकींचे प्राण वाचविण्यात बचाव पथकाला यश
– लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’
– जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी


