Dainik Maval News : विश्व हिंदू परिषद आणि माऊली ग्रुप ऑफ फूड बिझनेस यांच्या संयुक्त विद्यमाने नाणे मावळ भागातील करंजगाव व मोरमारवाडी परिसरातील गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या कुटुंबांसाठी दिवाळीनिमित्त किराणा मालाच्या संचचाचे वाटप करण्यात आले.
पुण्यातील गुलटेकडी येथील भुसार मालाचे व्यापारी व माऊली ग्रुप ऑफ फूड बिझनेसचे संयोजक निखिल राऊत आणि राहुल बनसोडे यांच्या सहकार्याने हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मोरमारवाडी गावातील सुमारे ७० गरजू कुटुंबांना किराणा मालाच्यासंचाचे वाटप करण्यात आले.
यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत दिवाळीच्या सणानिमित्त जीवनावश्यक वस्तूंची मदत मिळाल्याने या कुटुंबांच्या आनंदात भर पडली.
या संपूर्ण उपक्रमाची संकल्पना, कार्यक्रमाची रचना व मार्गदर्शन दादा वेदकजी (केंद्रीय सहमंत्री तथा अखिल भारतीय सत्संग प्रमुख विश्व् हिंदु परिषद ) व पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सेवाभावी उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
उपक्रमाच्या यशस्वितेसाठी विश्व हिंदू परिषद, मावळ-मुळशी जिल्ह्याचे जिल्हा मंत्री महेंद्र असवले व जिल्हा सेवा विभाग प्रमुख ॉमाणिक गवळी यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच गावातील तरुण मंडळ व काकडा आरती समिती यांनी मोलाचे सहकार्य केले.
या सामाजिक उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी विश्व हिंदू परिषद व माऊली ग्रुप ऑफ फूड बिझनेसचे आभार/ऋण व्यक्त केले. समाजातील गरजू व वंचित घटकांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेणारा हा उपक्रम सेवा, समर्पण, सामाजिक बांधिलकी आणि बंधुभावाचे प्रेरणादायी उदाहरण ठरला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर
– कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन
– वडगाव मावळमध्ये शुक्रवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा ; पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी नगरपंचायतीचा निर्णय
– पक्ष नेतृत्वाच्या बदनामीकारक पोस्टना प्रतिक्रिया देऊ नये ; “सोशल मीडियावर निरर्थक वाद नको” – गणेश खांडगे
