Dainik Maval News : श्री तीर्थक्षेत्र आई एकविरा देवी येथील मंदिर जतन, संवर्धन व परिसरातील विकासकामांना गती देण्यासाठी बुधवारी (दि.४) मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी आमदार सुनील शेळके व आबासाहेब नागरगोजे, अनिलकुमार गायकवाड, संदीप खलाटे, राहूल वसईकर, छाया नाईक, अश्विनी घोडके, नेहाल शेख आदी अधिकारी उपस्थित होते.
आई एकविरा देवी मंदिर जीर्णोद्धार व पुनर्बांधकाम यासोबतच भाविकांना सोयी सुविधा पूरक दगडी पायऱ्या बांधकाम, दर्शन रांग व्यवस्था, स्थानिकांसाठी नविन दुकानगाळे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मंदिर परिसरात दगडी पेव्हिंग ब्लाॅक, वाहनतळ सुधारणा, स्वच्छतागृह या विकासकामांसाठी २९ सप्टेंबर २०२२ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ₹३९ कोटी ४३ लाख निधी मंजूर करण्यात आला होता. हे काम MSRDC कडे सोपवण्यात आले होते.
परंतु सध्या, हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. याबाबत आमदार शेळके यांनी तीव्र संताप व्यक्त करत तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली. त्यावर अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व कामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर
– कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन
– वडगाव मावळमध्ये शुक्रवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा ; पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी नगरपंचायतीचा निर्णय
– पक्ष नेतृत्वाच्या बदनामीकारक पोस्टना प्रतिक्रिया देऊ नये ; “सोशल मीडियावर निरर्थक वाद नको” – गणेश खांडगे

