Dainik Maval News : जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असणाऱ्या वाकसई – सदापूर फाटा येथील कथीत अनधिकृत बांधकाम व धार्मिक स्थळाच्या विरोधात बुधवारी (दि. १८) हिंदूराष्ट्र सेना मावळ व ग्रामस्थ वाकसई यांच्या वतीने कार्ला फाटा येथे “रास्ता रोको” करण्याच्या हेतूने आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. नंतर सर्व आंदोलनकर्ते व पोलीस यांच्यात सामंजस्य चर्चा झाल्यानंतर कार्ला फाटा येथून संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थान, वाकसई येथे येथून शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले.
लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे व पीएमआरडीए तहसीलदार आशा होळकर यांनी आंदोलनकर्त्यांना, दिनांक 23 नोव्हेंबर रोजी कायद्याच्या नियमाला धरून बांधकाम निष्कासित केले जाईल, असे लेखी पत्र दिले व तूर्तास आंदोलन थांबविण्याची विनंती केली. परंतु आंदोलनकर्ते आपल्या मागणीवर ठाम राहून जोपर्यंत बांधकाम पाडले जात नाही, तोपर्यंत या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन केले जाईल असे म्हटले.
आंदोलनकर्ते, ग्रामस्थ म्हणाले, वाकसई ग्रामपंचायत व पीएमआरडीए यांची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीररित्या हे बांधकाम करण्यात आले आहे. ग्रामस्थांची देखील ते बांधकाम निष्कासित करण्याची मागणी आहे व पीएमआरडीए यांनी देखील हे बांधकाम बेकायदेशीर ठरवत ते काढून घेण्याचे आदेश दिलेले असताना देखील आदेशांना व सूचनांना केराची टोपली दाखवत आहे. त्यामुळे तातडीने हे बांधकाम निष्कासित करण्यात यावी, अशी मागणी हिंदू राष्ट्र सेना व वाकसई ग्रामपंचायत वतीने करण्यात आली आहे.
मावळातील हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच वाकसई – देवघर ग्रामस्थ व कार्ला परिसरातील ग्रामस्थांनी या आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनाला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही, तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी लोणावळा पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी कार्ला फाटा ते आंदोलन स्थळापर्यंत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– मावळातील ऊसतोड मजुरांच्या पालावर मंत्री पंकजा मुंडेंची मायेची भेट ; दुष्काळामुळे स्थलांतरित ऊसतोड मजूरांसमवेत दिवाळी साजरी
– पाचाणे येथे शेतकऱ्यांना मका बियाण्यांचे वाटप ; शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न
– श्री तीर्थक्षेत्र आई एकविरा देवी येथील मंदिर जतन, संवर्धन व परिसरातील विकासकामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश


