व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, November 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ ; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अंगणवाडी केंद्रांमधून ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पोषण, आरोग्य, पूर्वप्राथमिक शिक्षण तसेच गर्भवती महिला, स्तनदा मातांना पोषण,आरोग्याशी संबंधित सेवा दिल्या जातात.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 22, 2026
in महाराष्ट्र
3832 Anganwadi in maharashtra to become smart Minister Aditi Tatkare shares information

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्यातील अंगणवाडी केंद्रात देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये आधुनिक शैक्षणिक साहित्य आणि पायाभूत सुविधांची सुधारणा करत ३,८३२ अंगणवाड्यांना ‘स्मार्ट अंगणवाडी’ करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

अंगणवाडी केंद्रांमधून ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पोषण, आरोग्य, पूर्वप्राथमिक शिक्षण तसेच गर्भवती महिला, स्तनदा मातांना पोषण,आरोग्याशी संबंधित सेवा दिल्या जातात. आदर्श अंगणवाडी केंद्र तयार करून त्यात आधुनिक सुविधा देत बालकांना आनंददायी, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्मार्ट अंगणवाडी संकल्पना राबविण्यात येत आहे. शासकीय जागेत विद्युत जोडणी उपलब्ध असलेल्या केंद्रांचा विचार करून ३,८३२ अंगणवाडी केंद्रांना स्मार्ट करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या स्मार्ट अंगणवाडी किटमध्ये विविध आधुनिक सुविधा आणि साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ई-लर्निंगसाठी आवश्यक हार्डवेअर व सॉफ्टवेअर, स्वच्छ भारत किट, वॉटर प्युरिफायर, हात धुण्यासाठी बेसिन सुविधा, अंगणवाडी इमारतीची रंगरंगोटी, इमारतीची आवश्यक किरकोळ दुरुस्ती, रेन वॉटर हार्वेस्टिंग तसेच स्वयंपाकघराचे आधुनिकीकरण याबाबींचा समावेश आहे.

अंगणवाडी केंद्रांमधील सुविधा आधुनिक आणि सक्षम करण्यासाठी टप्प्याटप्प्याने स्मार्ट अंगणवाड्यांची निर्मिती करण्यात येत असून बालकांच्या पोषण, आरोग्य आणि प्रारंभिक शिक्षणासाठी अधिक गुणवत्तापूर्ण वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– कामशेतमधील पॅराग्लायडिंग साहसी खेळ टिकणार ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला यश
– वाकसई – सदापूर रोड येथील अनाधिकृत बांधकाम पाडण्यासाठी हिंदूराष्ट्र सेना व स्थानिक ग्रामस्थांचे आंदोलन
– हक्काचे पाणी वाचविण्यासाठी आंदर मावळात धरणग्रस्त कृती समिती आक्रमक; गावोगावी घोंगडी बैठका घेणार


dainik maval jahirat

Previous Post

पुणे जिल्ह्यात १९ हजार एकर क्षेत्रासाठी ज्वारी बियाणे, तर ६ हजार एकर क्षेत्रासाठी मोफत हरभरा बियाणाचा कृषी विभागाकडून पुरवठा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

3832 Anganwadi in maharashtra to become smart Minister Aditi Tatkare shares information

राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ ; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

November 22, 2026
Agriculture Department is supplying sorghum seeds and free chickpea seeds in Pune district

पुणे जिल्ह्यात १९ हजार एकर क्षेत्रासाठी ज्वारी बियाणे, तर ६ हजार एकर क्षेत्रासाठी मोफत हरभरा बियाणाचा कृषी विभागाकडून पुरवठा

November 22, 2026
drought-affected taluka total number of talukas in state declared as drought-affected now stands at 310

३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी सहा तालुक्यांचा समावेश ; राज्यातील दुष्काळ घोषित तालुक्यांची संख्या ‘३१०’

November 22, 2026
Resolve issues of the Pavana dam-displaced people in time-bound manner said Minister Chandrashekhar Bawankule

पवना धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न कालबद्ध पद्धतीने निकाली काढा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

November 21, 2026
25 meritorious students from Pune Zilla Parishad will visit NASA Stanford University Google campus

पुणे जिल्हा परिषदेचे २५ गुणवंत विद्यार्थी अमेरिकेतील नासा, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि गुगल परिसराला देणार भेट

November 21, 2026
FDA Action in Lonavala Maval food licenses of four well-known hotels suspended

मोठी बातमी! लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेलचे अन्न परवाने निलंबित, ‘एफडीए’ची धडक कारवाई । FDA Action in Lonavala

November 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.