व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, November 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांचा ‘महाराष्ट्राची कर्मयोगिनी’ पुरस्काराने होणार सन्मान

प्रशांतदादा भागवत युवा मंचच्या वतीने १ डिसेंबर रोजी आयोजित भव्य कीर्तन सोहळ्यात होणार पुरस्काराचे वितरण

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 27, 2026
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
Sunetra Pawar first female Deputy Chief Minister of Maharashtra will be honored with Maharashtrachi Karmayogini award in maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


  • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राची कर्मयोगिनी’, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना ‘महाराष्ट्राचे कर्मयोगी’, तर डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर यांचा ‘वारकरी भूषण’ पुरस्काराने होणार गौरव

Dainik Maval News : मावळ तालुक्यातील इंदोरी येथे येत्या १ डिसेंबर रोजी, भक्तीचा जागर, पर्यावरण संवर्धनाची बांधिलकी अन् समाजाभिमुख नेतृत्वाबद्दल कृतज्ञता यांचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळणार आहे. वारकरी सांप्रदाय आमणे लोणार परिसर आयोजित पायी पालखी सोहळा २०२६ (वर्ष ५ वे) निमित्त भव्य कीर्तन सोहळा, धर्म ध्वज स्थापना, इंद्रायणी नदी स्वच्छता संकल्प आणि विशेष पुरस्कार यांचे वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धर्मध्वज स्थापना करण्यात येणार असून मावळ तालुक्यातील सर्व वारकरी संप्रदायाच्या साक्षीने इंद्रायणी नदी स्वच्छतेचा सामूहिक संकल्प केला जाणार आहे. भक्तीचा जागर बरोबरच नदी स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणार हा उपक्रम सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरणार आहे. या सोहळ्यातच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांना ‘महाराष्ट्राची कर्मयोगिनी’, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना ‘महाराष्ट्राचे कर्मयोगी’ तर संतांचे विचार घराघरात पोहोचविणारे अध्यात्मिक गुरु डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर (उर्फ पंकज महाराज गावडे) यांना ‘वारकरी भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

दरम्यान, वारकरी सांप्रदाय आमणे लोणार परिसर आयोजित पायी पालखी सोहळा निमित्त प्रसिद्ध कीर्तनकार हभप विशाल महाराज खोले यांची कीर्तनसेवा होणार आहे. याप्रसंगी हभप ओमकार महाराज जगताप आणि हभप कैलास महाराज पवार यांचे गीत गायन होईल, तर हभप कृष्ण महाराज भोरकडे यांची मृदुंगाची साथ लाभणार आहे. येत्या मंगळवारी (दि. १ डिसेंबर २०२६) रोजी सायंकाळी सात वाजता इंदोरी (ता. मावळ) जवळील प्रशांत पेट्रोलियम शेजारील इंदोरी बायपास येथे हा सोहळा रंगणार आहे.

या कार्यक्रमाचे निमंत्रक महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे ओबीसी मोर्चाचे सचिव प्रशांत चंद्रकांत भागवत हे असून कार्यक्रमाचे आयोजन प्रशांत दादा भागवत युवा मंच यांच्या वतीने करण्यात आले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– श्री एकविरा देवी मंदिर परिसरातील रस्ता रुंदीकरण, पायऱ्यांचे रुंदीकरण आदी विकासकामे लवकरच पूर्ण होणार ; जागेसाठी तत्काळ परवानगी देण्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे आदेश
– पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवड ; मावळ तालुक्यातील ९१ शेतकऱ्यांना मिळणार शेततळे
– मावळ तालुक्यात अत्याधुनिक बस थांबे उभारण्यासाठी 1 कोटी 80 लाखांचा निधी ; आमदार सुनील शेळके यांनी मानले राज्य सरकारचे आभार


dainik maval jahirat

Previous Post

श्री एकविरा देवी मंदिर परिसरातील रस्ता रुंदीकरण, पायऱ्यांचे रुंदीकरण आदी विकासकामे लवकरच पूर्ण होणार ; जागेसाठी तत्काळ परवानगी देण्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे आदेश

Next Post

श्रीक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त तुकाराम गाथेतील अभंग संख्येइतक्या वृक्षांची लागवड

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
4538 trees planted total count of abhang contained in Tukaram Gatha In Dehu

श्रीक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त तुकाराम गाथेतील अभंग संख्येइतक्या वृक्षांची लागवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

4538 trees planted total count of abhang contained in Tukaram Gatha In Dehu

श्रीक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त तुकाराम गाथेतील अभंग संख्येइतक्या वृक्षांची लागवड

November 27, 2026
Sunetra Pawar first female Deputy Chief Minister of Maharashtra will be honored with Maharashtrachi Karmayogini award in maval

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांचा ‘महाराष्ट्राची कर्मयोगिनी’ पुरस्काराने होणार सन्मान

November 27, 2026
Development works in vicinity of Shri Ekvira Devi Temple including widening of roads stairs are set to be completed soon

श्री एकविरा देवी मंदिर परिसरातील रस्ता रुंदीकरण, पायऱ्यांचे रुंदीकरण आदी विकासकामे लवकरच पूर्ण होणार ; जागेसाठी तत्काळ परवानगी देण्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे आदेश

November 27, 2026
Lohagad-Fort

संविधान दिनानिमित्त गुरुवारी किल्ले लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियान ; राज्यघटनेच्या उद्देशिकेचे होणार सामूहिक वाचन

November 26, 2026
4726 farmers in Pune district selected for farm ponds 91 farmers in Maval taluka

पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवड ; मावळ तालुक्यातील ९१ शेतकऱ्यांना मिळणार शेततळे

November 26, 2026
Overwhelming response from women to Ajit Jansamvad Vikas Abhiyan in Maval taluka

मावळमध्ये अजित जनसंवाद विकास अभियानाला महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.