तळेगाव दाभाडे ( Talegaon Dabhade ) येथे महाराष्ट्र राज्य ( Maharashtra State ) शिक्षक परिषद ( Teachers Council ) मावळ तालुका ( Maval Taluka ) यांची सहविचार सभा पार पडली. यावेळी परिषदेचे मावळ तालुक्याचे मावळते अध्यक्ष आणि राज्य शिक्षक परिषदेचे सल्लागार प्रा भाऊसाहेब आगळमे ( Bhausaheb Agalme ) यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्याची नूतन कार्यकारिणी जाहीर ( New Executive Announced ) करण्यात आली. आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्या निकेतन शाळेचे शिक्षक गणेश पाटील ( Ganesh Patil ) यांची यावेळी जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.
हेही वाचा – आजिवली येथील ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेतील शिक्षकाला ‘जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार’ जाहीर
या सभेवेळी परांजपे शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे, समर्थ शाळेचे प्राचार्य संजय वंजारे, पांडुरंग कापरे धनंजय नांगरे, नारायण असवले, राम कदमबांडे, वशिष्ठ गटकुळ, महिला प्रतिनिधी सविता चव्हाण, वैशाली कोयते, संघटक अशोक कराड, राजकुमार वरघडे, सोमनाथ साळुंके, योगेश पाटील, सुरेश बारसकर यांच्यासह मोठा शिक्षक वर्ग उपस्थित होता.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ तालुका नूतन अध्यक्षपदी प्रगती विद्या मंदिर इंदोरी येथील जेष्ठ अध्यापक लक्ष्मण मखर यांची, कार्यवाहपदी लोणावळा नगरपरिषद शाळेतील इंग्रजी विषयाचे जेष्ठ अध्यापक देवराम पारीठे यांची एकमताने निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणी –
कार्याध्यक्ष – भारत काळे -पवनानगर
उपाध्यक्ष –
1) सोपान असवले – टाकवे
2) श्रीनिवास गजेंद्रगडकर – लोणावळा
सहकार्यवाह –
रियाज तांबोळी – कान्हे
कोषाध्यक्ष –
राजेंद्र भांड – माळेगाव
पुणे जिल्हा उपाध्यक्ष –
भाऊसाहेब खोसे – बऊर
जिल्हा प्रतिनिधी
गणेश पाटील – अजिवली, जवण
( Maharashtra State Teachers Council Maval Taluka New Executive Announced )
अधिक वाचा –
व्हिडिओ : ‘अजूनही वेळ गेलेली नाही’, आमदार सुनिल शेळके यांचे निषेध मोर्चात दमदार भाषण
प्रियकराचा लग्नास नकार, तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, लोणावळ्यातील धक्कादायक घटना