व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अंधाऱ्या रात्री दुचाकीसह दरीत कोसळलेल्या तरुणाला वाचवण्याचा थरार, मुंबई-पुणे महामार्गावर शिंग्रोबा मंदिराजवळील घटना

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीम, देवदूत टीम, शिवदुर्ग मित्र लोणावळा टीम, फायर ऑफिसर हरी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली अग्निशमन दल टीम, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्सचे जवान, खोपोली शहर पोलिस, लोणावळा शहर पोलिस, बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा आदी यंत्रणा या कार्यात सहभागी झाल्या होत्या.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 25, 2023
in महाराष्ट्र, मावळकट्टा
Bike-Accident-Old-Mumbai-Pune-Highway

Photo : Gurunath Sathilkar


जुन्या मुंबई पुणे हायवेवर मंगळवारी (दिनांक 24 जानेवारी) रात्री एक थरारक अपघात घडला. जुना पुणे-मुंबई महामार्गावर शिंग्रोबा मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या खिंडीत रात्रीच्या वेळी एक दुचाकीस्वार (एक्टिवा स्कूटी) दुचाकी घसरल्याने दरीत कोसळला. अक्षय अशोक महाजन (वय 29 वर्ष, रा. सुकापूर, नवीन पनवेल) हा युवक पुण्याहून पनवेलला जात असताना दरीत कोसळला. त्याने स्वतः आपण दरीत कोसळलो असून खाली घसरत चाललो आहे, याची माहिती वडिलांना फोनद्वारे दिली. त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याचा शोध सुरु केला आणि लोणावळा शहर पोलिसांना याबाबत माहिती दिली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

लोणावळा शहर पोलिसांनी तत्काळ पाऊले उचलत मुंबई पुणे हायवेवर त्याचा शोध सुरु केला. अक्षय दरीत कोसळला, पण नेमके कुठे हे ठाऊक नव्हते, तेव्हा शोध चालू असतानाच त्याची दुचाकी शिंग्रोबा मंदिराच्या पाठीमागील दरीत घसरल्याचे समजले. त्यानंतर तिथे टीम पोहोचली तेव्हा 50 फुटांवर दुचाकी दिसून आली. मात्र, अक्षय त्याहून खोल 250 फुट दरीत होता. त्यामुळे पोलिसांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी, शिवदुर्ग मित्र लोणावळा, देवदूत टीम यांना पाचारण केले. सर्वांनी अत्यंत साहसाने आणि अथक प्रयत्नाने अक्षयला वर काढले. तसेच दुचाकी देखील वर खेचण्यात आली. ( Bike Accident Near Shingroba Temple On Old Mumbai Pune Highway Rescue By Shivdurg Mitra Team Lonavala Pune Khopoli Raigad )

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीम, देवदूत टीम, शिवदुर्ग मित्र लोणावळा टीम, फायर ऑफिसर हरी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली अग्निशमन दल टीम, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्सचे जवान, खोपोली शहर पोलिस, लोणावळा शहर पोलिस, बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा आदी यंत्रणा या कार्यात सहभागी झाल्या होत्या.

शिवदुर्ग मित्रचे योगेश उंबरे, सुरज वरे, ओंकार पडवळ, अशोक उंबरे, प्रणय अंभोरे, हर्ष तोंडे, हर्षल चौधरी, रतन सिंग, अमर ठाकर, कपिल दळवी, आनंद गावडे सर, सुनिल गायकवाड हे या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते. शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था आणि देवदूत टीमचे खोपोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक शिरीष पवार यांनी तोंडभरून कौतुक केले.

अधिक वाचा –

– नाणेघाटात तब्बल 1200 फूट खोल दरीत कोसळलेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्याचा थरार! शिवदुर्ग टीमची साहसी कामगिरी
– शिवसम्राट प्रतिष्ठान वर्धापन दिन आणि स्व. भाऊ लायगुडे यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर; उद्घाटक सुधाकर शेळकेंचेही रक्तदान


dainik maval jahirat

Previous Post

शिवसम्राट प्रतिष्ठान वर्धापन दिन आणि स्व. भाऊ लायगुडे यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर; उद्घाटक सुधाकर शेळकेंचेही रक्तदान

Next Post

‘तिरंग्यासाठी हजारोंचे बलिदान, तो पायदळी जाऊ नये’, राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी भारत फ्लॅग फाऊंडेशनची विशेष मोहीम

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Tiranga-National-Flag-India

'तिरंग्यासाठी हजारोंचे बलिदान, तो पायदळी जाऊ नये', राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी भारत फ्लॅग फाऊंडेशनची विशेष मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.