इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव दाभाडे इथे आयोजित ‘मावळभूषण कृष्णराव भेगडे’ व्याख्यानमालेत सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल आण्णासाहेब उर्फ तानाजी कोंडीबा दाभाडे यांना ‘इंद्रायणी विद्यामंदिर पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले.
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहर भागातील एक आदरणीय व्यक्तिमत्व असलेले आण्णासाहेब दाभाडे यांच्या सामाजिक कार्याला मिळालेली ही पोचपावती आहे. ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ( Talegaon Dabhade Annasaheb Dabhade Awarded Indrayani Vidyamandir Award By Panipatkar Vishwas Patil )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेतर्फे ‘मावळभूषण कृष्णराव भेगडे’ व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. या व्याख्यानमालेत ज्येष्ठ साहित्यिक आणि पानिपतकार विश्वास पाटील यांनी आपले विचार मांडले. व्याख्यानमालेचे यंदाचे हे आठवे वर्ष आहे. मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी तालुक्यातील शिक्षण, उद्योग, साहित्य, समाजकारण आणि सहकार क्षेत्रात अमुल्य योगदान दिले आहे. त्यांचे कार्य आणि विचार युवा पिढीपर्यंत पोचवण्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे मधील बलुतेदार महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी वैष्णवी टकले
–मावळ तालुक्यात ‘जंगलराज’ची झलक! शिवली गावात रस्त्याच्या वादातून तुंबळ हाणामारी, वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल