व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सुदुंबरेतील सिद्धांत कॉलेजमध्ये शिवजयंतीच्या कार्यक्रमावेळी किरकोळ कारणावरुन तुफान राडा, 9 जणांवर गुन्हा

दिनांक 17 फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच ते दुपारी साडेतीनच्या दरम्यान सिद्धांत कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सुदुंबरे च्या आवारात सुदूंबरे गावाच्या (ता. मावळ जि. पुणे) चौकामध्ये हा सर्व प्रकार घडला. या प्रकरणी दिनांक 18 फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा फिर्याद दाखल करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 20, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Talegaon-MIDC-Police-Station

File Image - Talegaon MIDC Police Station


मावळ तालुक्यातील सुदुंबरे मध्ये सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनियरिंग इथे शिवजयंतीच्या कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरुन जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. याबाबत ओम विजय शिंदे (वय 18, व्यवसाय शिक्षण, रा. बोराटे आळी नागेश्वर मंदिराचे मागे, मोशी गावठाण, ता. हवेली जि. पुणे) याने तळेगाव एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

फिर्यादी ओम शिंदे याने दिलेल्या फिर्यादीवरुन तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी एकूण 9 आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम 143, 147, 149, 324, 323, 506 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) (3) / 135 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 1) राज बेहरा, 2) ओंकार बोरकर, 3) संस्कार गाडे, 4) विनय गाडे, 5) साहिल बोरकर, 6) प्रतिक गाडे आणि इतर 2 ते 3 व्यक्ती सर्वजण राहणार सुदूंबरे (तालुका मावळ, जिल्हा पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक 17 फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच ते दुपारी साडेतीनच्या दरम्यान सिद्धांत कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सुदुंबरे च्या आवारात सुदूंबरे गावाच्या (ता. मावळ जि. पुणे) चौकामध्ये हा सर्व प्रकार घडला. या प्रकरणी दिनांक 18 फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा फिर्याद दाखल करण्यात आली. ( Talegaon MIDC Police Registered Case Against 9 Persons For Fighting Over Minor Reason During Shiv Jayanti Program At Siddhant College In Sudumbare Maval )

हेही वाचा – सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करणाऱ्या 2 महिलांविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर ठिकाणी आरोपी यांनी कॉलेजमध्ये शिवजयंती कार्यक्रमावेळी शोभकामाचे पेपर प्लास्टिंग मशिनला लाथ मारल्याचा जाब विचारल्यावरुन चिडून जाऊन फिर्यादीला हाताने आणि फिर्यादीच्या इतर 3 मित्रांना हाताने आणि बांबूच्या काठीने मारहाण करुन जखमी केले, अशी फिर्याद देण्यात आली आहे. यातील एकाही आरोपी अटक करण्यात आलेली नसून या प्रकरणी पुढील तपास सपोनि पांडे हे करत आहेत.

अधिक वाचा –

– किल्ले लोहगडावर महाशिवरात्र जल्लोषात साजरी! पंचक्रोशीतील नागरिकांनी केलेल्या शिवघोषाने दुमदुमला परिसर
– पवना शिक्षण संकुलात शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न, पारंपारिक वेषातील बालगोपाळांनी वेधले सर्वांचेच लक्ष


dainik maval jahirat

Previous Post

सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करणाऱ्या 2 महिलांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

मोठी बातमी! प्रसिद्ध गायक सोनू निगमवर मुंबईत हल्ला, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sonu-Nigam-Assaulted

मोठी बातमी! प्रसिद्ध गायक सोनू निगमवर मुंबईत हल्ला, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vehargaon Dahivali Villagers rasta roko demand cancellation of proposed ropeway project at Ekvira Devi temple

वेहरगाव, दहिवली ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको ; एकविरा देवी मंदिर येथील प्रस्तावित रोप-वे प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 31, 2026
Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.