चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार श्रीमती आश्विनी लक्ष्मण जगताप यांनी एकूण 1 लाख 35 हजार 603 मते घेत प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुुल कलाटे यांचा तब्बल 36 हजारांहून अधिकच्या मताधिक्याने दणदणीत पराभव केला. त्यांच्या विजयानंतर चिंचवड लगतच्या मावळ ( Maval News ) विधानसभेतही भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ( After victory of Ashwini Jagtap in Chinchwad Assembly by-election BJP workers Jubilation at Kamshet maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कामशेत इथे भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, मिठाई वाटप करत आश्विनी जगताप यांच्या विजयाचा आनंद साजरा केला. कामशेत शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने 2 मार्च रोजी रात्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, कामशेत येथे फटाके जल्लोष साजरा करण्यात आला. कामशेत शहर युवा अध्यक्ष प्रविण शिंदे यांनी नागरिकांना लाडू-पेढे वाटत सर्वांचे तोंड गोड केले.
यावेळी मावळ भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, मा सरपंच वसंत काळे, जेष्ठ नेते बाळासाहेब गोरे, कार्याध्यक्ष शंकर पिंगळे, दत्तात्रय भोईर, अर्जुन शिंदे, बबलु सुर्वे, गणेश शिंदे, सुहास लोंणकर आदी भारतीय जनता पार्टी कामशेत पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक वाचा –
– चिंचवड पोटनिवडणूक निकाल : भाजपच्या आश्विनी जगताप विजयी! नाना काटे, राहुल कलाटे पराभूत; कुणाला किती मते? वाचा सविस्तर
– कसबा पोटनिवडणूक निकाल : महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर मोठ्या मताधिक्याने विजयी, हेमंत रासने पराभूत, वाचा सविस्तर