व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुण्यातील औंध आयटीआय इथे 13 मार्चपासून व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे आयोजन, जाणून घ्या

कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील युवक- युवतीसाठी अल्पमुदतीच्या रोजगारक्षम विनाशुल्क व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमांचे दिनांक 13 मार्चपासून आयोजन करण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 6, 2023
in पुणे, ग्रामीण, शहर
Aundh-ITI-Pune

File Image - Aundh ITI Pune


कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ( आयटीआय ) अल्पसंख्यांक समाजातील युवक- युवतीसाठी अल्पमुदतीच्या रोजगारक्षम विनाशुल्क व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमांचे दिनांक 13 मार्चपासून आयोजन करण्यात आले आहे. ( Organization of business training course for minority community students at Aundh Industrial Training Institute Pune )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम, शिख, जैन, पारसी, ख्रिश्चन तसेच बौद्ध, नवबौद्ध, हिंदू-महार या घटकातील काही कारणास्तव पूर्णवेळ किंवा दीर्घ मुदतीचे प्रशिक्षण पूर्ण करू शकत नाहीत, असे बेरोजगार युवक, युवती किंवा आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना अधिकचे कौशल्य प्राप्त करण्यासाठी या अल्पमुदतीच्या कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

सुरुवातीला अल्पसंख्याक समाजातील युवकांसाठी एकूण सहा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून त्यामध्ये फील्ड टेक्निशियन- एसी, सीएनसी सेटर कम ऑपरेटर टर्निंग, ड्राफ्ट्समन- मेकॅनिकल, क्यूसी इन्स्पेक्टर लेव्हल 4, ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्निशियन लेव्हल 3, मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग/शील्डेड मेटल आर्क वेल्डिंग वेल्डर या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यापैकी फील्ड टेक्निशियन- एसी हा अभ्यासक्रम 13 मार्च 2023 पासून सुरु करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे, शिक्षण किमान इयत्ता आठवी ते दहावी उत्तीर्ण असावे.

या अभ्यासक्रमांना प्रवेश देताना युवतींना प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रत्येक व्यवसायातील प्रवेश क्षमता 30 आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्याचा आहे. प्रवेश घेण्यासाठी गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट, आधार कार्डची छायांकित प्रत, अल्पसंख्याक उमेदवारांसाठी अल्पसंख्याक असल्याचा पुरावा आदी कागदपत्रे तसेच दोन छायाचित्रे आवश्यक आहेत. या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे उपसंचालक रमाकांत भावसार यांनी केले आहे.

अधिक वाचा –

– तळेगाव दाभाडेत ‘अरावल्ली टेरेन व्हेईकल चॅम्पियनशिप 2023’ स्पर्धेचे आयोजन, देशभरातील विद्यार्थी सहभागी । ATVC 2023
– पवनानगर इथे लायन्स क्लब ऑफ आकुर्डी यांच्यावतीने विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप आणि नेत्र तपासणी शिबिर


Previous Post

पत्नीची छेड काढणाऱ्या भामट्यांना जाब विचारायला गेलेल्या पतीला बेदम मारहाण, देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल, 3 आरोपी अटकेत

Next Post

महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहर कार्यकारिणी जाहीर, रुपेश म्हाळसकरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान, पाहा संपूर्ण यादी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MNS-Lonavala-City-Maval

महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहर कार्यकारिणी जाहीर, रुपेश म्हाळसकरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान, पाहा संपूर्ण यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Statement to MP Shrirang Barne of Pawana Dam Affected Joint Organization

“…अन्यथा पवना धरणाचे पाणी बंद आंदोलन छेडणार” ; पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन

June 2, 2026
coming future will give new direction Bala Bhegde guidance to BJP workers in Maval

‘येणारा भविष्यकाळ, नवी दिशा देणारा’ ; माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे मावळमधील भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

June 2, 2026
Maval Taluka Kjaredi vikri sangh to start Cooperative Agricultural Service Center Farmers will get seeds fertilizer

मावळ तालुका खरेदी विक्री संघ सुरू करणार ‘सहकार कृषी सेवा केंद्र’ ; शेतकऱ्यांना मिळणार इंद्रायणी भाताचे बियाणे आणि खत

June 2, 2026
Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.