व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, May 9, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महिलेद्वारे संपर्क करुन भेटायला बोलावत मारहाण आणि लुटमार करणाऱ्या टोळीचा कामशेत पोलिसांकडून पर्दाफाश

मावळ तालुक्यातील कामशेत पोलिस ठाण्यात दाखल एका फिर्यादीचा तपास पूर्ण करताना कामशेत पोलिसांनी, महिलेद्वारे संपर्क करुन भेटायला बोलावून लोकांना मारहाण करत लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 7, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Kamshet-Police-Maval

Photo Courtesy : Sanjay Jagtap


मावळ तालुक्यातील कामशेत पोलिस ठाण्यात दाखल एका फिर्यादीचा तपास पूर्ण करताना कामशेत पोलिसांनी, महिलेद्वारे संपर्क करुन भेटायला बोलावून लोकांना मारहाण करत लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. कामशेत पोलिसांनी दाखल फिर्यादीवर तत्काळ एक्शन घेत अवघ्या 12 तासात ही कामगिरी केली आहे. ( Kamshet Police Busted Gang Who Beating And Robbing Citizens By Contacting Through Women )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 01 मार्च 2023 रोजी रात्री 11 वाजता महिला आरोपीने फिर्यादी आदेश दत्ता दहीभाते (वय 24 वर्षे, रा. बेडसे ता. मावळ जि. पुणे) याचा मित्र सुरज चौधरी याच्या मोबाईल फोनवर फोन करुन फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना शिवशंकर मंगलकार्यालयाजवळ भेटण्यासाठी बोलावले होते.

tata panchjaynya car ads

फिर्यादी आणि त्याचे चार मित्र हे त्या महिलेला भेटण्यासाठी गेले असता सदर ठिकाणी पुर्वीपासुन दबा धरुन बसलेल्या 1) सतिष बिडलाम, 2) रुपेश लालगुडे, 3) प्रतिक निळकंठ 4) रोहीत उर्फ बाबु चोपडे आणि त्यांचे इतर तीन ते चार साथीदार यांनी फिर्यादी व त्यांचे साथीदार यांना शिवशंकर मंगलकार्यालयाचे पाठीमागील बाजुला नेऊन चामडी पट्टा, लाकडी दांडके व लोंखडी रॉडने बेदम मारहाण केली.

त्यानंतर आरोपींनी फिर्यादी आणि त्याच्या मित्रांना पिस्टलचा धाक दाखवून तुमच्याविरुध्द खोटी बलात्काराची केस करतो, अशी भीती घालून त्यांना चारचाकी गाडीत बसवुन त्यांचे अपहरण करुन त्यांना कुसगांव येथील एका डोंगरात नेऊन तिथे त्यांचे कपडे काढून त्यांचे नग्न फोटो काढले आणु आरोपींनी फिर्यादीस दोन लाख रुपये द्या नाहीतर तुमचे फोटो व्हायरल करतो, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांना पुन्हा गाडीत बसवुन तसेच फिर्यादीची स्विप्ट कार ताब्यात घेऊन त्यांना पैशाची मागणी करुन अपहरण करुन त्याना लोणावळा कुसगांव, वडगांव, तळेगांव येथे नेऊन मारहाण केली.

हेही वाचा – मावळ तालुक्यात धूलिवंदन सणाला गालबोट! रंगलेले हातपाय धुवायला इंद्रायणी नदीत उतरलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

सदर प्रकाराबाबत माहिती मिळताच अपहरण झालेल्या फिर्यादी आणि त्यांचे मित्र यांची सुटका करण्याकरिता रात्रीच तत्काळ पोलिस निरिक्षक जगताप आणि पथक यांनी इतर पोलीस स्टेशनचे रात्रगस्तीचे वाहनांना सतर्क करुन नाकाबंदी केली. तेव्हा पोलिसांचा पाठलाग सुरु असल्याची चाहुल लागताच आरोपींनी फिर्यादीच्या मित्रांकडून ऑनलाईन 20 हजार रुपये घेऊन अपहरण केलेल्या फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना तळेगांव दाभाडे येथे पहाटे सोडून तेथून वाहनासह पळ काढला.

त्यानंतर आरोपी यांनी फिर्यादी आणि त्यांचे मित्रांना बेदम मारहाण करुन त्यांचेकडुन 20 हजार रुपये घेवून त्यांना तळेगांव येथे रस्त्यावर सोडुन दिले होते. त्याबाबत कामशेत पोलीस स्टेशन येथे फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन गुन्हा रजिस्टर नंबर 60/2023 भादवि कलम 364 (ए), 326, 324, 323, 504, 506, 143, 144, 147, 148, 149, आर्म एक्ट 3, 25 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

हेही वाचा – मुस्लीम धर्मगुरुच्या पत्नीचा विनयभंग, देहूरोड येथील धक्कादायक घटना, दोन जणांवर गुन्हा दाखल

गुन्ह्यातील आरोपी हे शिर्डी येथे असल्याबाबत गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने पोलिस निरिक्षक संजय जगताप यांनी पोलीस स्टेशनकडील सपोनि पवार आणि पथक यांना आरोपींचा शोध घेण्याकरिता शिर्डी येथे रवाना केले. त्या तपास पथकाने शिर्डी येथे जावुन आरोपी 1) प्रतिक उर्फ लाया अर्जुन निळकंठ (वय 24 वर्षे रा. छावा चौक कामशेत ता. मावळ जि. पुणे) 2) रुपेश उर्फ कवठया विजय लालगुडे (वय 24 वर्षे रा. कुसगांव खुर्द ता. मावळ जि. पुणे) 3) सतीश कृष्णकुमार बिडलाम (वय 28 वर्षे रा. कामशेत ता. मावळ जि. पुणे) 4) रोहीत गणेश चोपडे (वय 27 वर्षे रा. कामशेत ता. मावळ जि. पुणे) 5) साहील महादेव भिसे (वय 20 वर्षे रा. चिंचवड पुणे) ६) महिला आरोपी (वय 20 वर्षे रा. वडगांव मावळ) यांच्या मुसक्या आवळुन त्यांना ताब्यात घेतले असुन सदर आरोपी हे पोलीस कोठडीत असुन गुन्हयाचा तपास सुरु आहे.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 12 तासाच्या आतमध्येच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. सदरची कामगिरी ही अंकित गोयल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण), मितेश घट्टे (अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रा) भाऊसाहेब ढोले (उपविभागीय पोलीस अधिकारी, हवेली विभाग अति. कार्य. लोणावळा विभाग) यांचे मागदर्शनाखाली पोलिस निरिक्षक संजय जगताप, सहा. पोलीस निरीक्षक आकाश पवार, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहा. फौजदार अब्दुल शेख, सहा. फौजदार समीर शेख, पो. हवा. तावरे, पो. हवा. राय, पो. ना. गवारी, पो. ना. वाळुंज, पो. ना. विरणक, हिप्परकर, कळसाईत पो. कॉ. ननवरे, पो. कॉ. राऊळ, पो. कॉ. डोईफोडे, म.पो.कॉ. कुंदे, मपोकॉ बैरागदार यांनी केली आहे. ( Kamshet Police Busted Gang Who Beating And Robbing Citizens By Contacting Through Women )

अधिक वाचा –

– तळेगाव दाभाडे शहरात अंमली पदार्थ विकणाऱ्याला रंगेहाथ अटक, तब्बल पाऊणे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त
– पत्नीची छेड काढणाऱ्या भामट्यांना जाब विचारायला गेलेल्या पतीला बेदम मारहाण, देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल, 3 आरोपी अटकेत


dainik-maval-ads

Previous Post

मुस्लीम धर्मगुरुच्या पत्नीचा विनयभंग, देहूरोड येथील धक्कादायक घटना, दोन जणांवर गुन्हा दाखल

Next Post

तुकाराम बीज सोहळ्यासाठी पवनमावळ भागातून दिंडीचे प्रस्थान, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करत वारकरी देहूच्या दिशेने मार्गस्थ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Warkari-Dindi-Maval

तुकाराम बीज सोहळ्यासाठी पवनमावळ भागातून दिंडीचे प्रस्थान, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करत वारकरी देहूच्या दिशेने मार्गस्थ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Kamshet Gram Panchayat Maval

कामशेत ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कविता काळे यांची निवड । Kamshet News

May 9, 2025
Abandoned vehicles Vadgaon Maval Police Station

पुणे आरटीओने अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे आवाहन । Pune News

May 9, 2025
Marketing Board of Directors meeting in Pune under the chairmanship of Minister Jayakumar Rawal

तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेला देण्यात येणाऱ्या निधीत वाढ करणार – पणन मंत्री जयकुमार रावल

May 9, 2025
Lok-Adalat

वडगाव मावळ येथे शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन । Vadgaon Maval

May 9, 2025
There is talk former taluka president of Maval MNS Rupesh Mhalaskar is on path of joining NCP Sharad Pawar Party

मावळ मनसेत पडणार खिंडार? माजी तालुकाध्यक्ष शरद पवारांच्या पक्षात जाणार? नेत्यांच्या भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण । Maval News

May 9, 2025
Youth Congress Maval Taluka President Rajesh Waghole joins Shiv Sena party

मावळमध्ये काँग्रेसला मोठा झटका ! युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षाने सोडला ‘हात’, शिवसेनेला देणार साथ । Maval News

May 9, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.