दिनांक 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन, यंदाचा हा जागतिक महिला दिन गुरुवारी (दिनांक 9 मार्च) मावळ तालुक्यातील महागाव इथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्था तळेगाव दाभाडे यांच्यामार्फत जागतिक महिला दिनी महागाव इथे महिलांसाठी खास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महागाव गावामध्ये हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्थेमार्फत व्यवसाय विकास प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दृष्टीने विविध व्यवसाय गावस्तरावर करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. त्याच बरोबर गावातील महिलांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली, त्या संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. ( Business Development Training Camp At Mahagaon Village In Maval Taluka Through Hand in Hand India NGO On Occasion Of International Womens Day )
सदर प्रशिक्षण व शासकीय योजना जण जागृती कार्यक्रमास गावचे उपसरपंच स्वाती बहिरट, ग्राम पंचायत सदस्य – योगिता सावंत, मा उपसरपंच शोभा सावंत, शिक्षिका – मोनिका पोटे, शाळा व समिती अध्यक्षा – दीपाली घारे, अंगणवाडी सेविका – ज्योती होजगे, अंगणवाडी मदतनीस – जाणगुणाबाई घारे, आशा कार्यकर्त्या – ज्योस्त्ना घारे व गावातील इतर महिला मोठया संख्येने उपस्थिती नोंदविली.
सदर कार्यक्रमास हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेमार्फत मोहन सोनावणे, सारिका शिंदे, अश्विनी खराडे, मलेका अन्सारी व यशोदा कालेकर इत्यादी संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– लायन्स क्लबकडून जागतिक महिला दिनी विद्यार्थिनींसाठी मोफत सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचे वाटप
– आदिम कातकरी सेवा अभियान : दहिवली येथील आदिवासी बांधवांना आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून घरपोच जातीचे दाखले