पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे रविवारी (12 मार्च) मावळ तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी चांदखेड इथे बारमुख क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन केलं. यावेळी पालकमंत्र्यांना क्रिकेट खेळण्याचा मोह काही आवरला नाही आणि हातात बॅट घेऊन चंद्रकांत पाटलांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांच्या समवेत मावळचे माजी आमदार बाळा भेगडे , भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे आदी उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रविवारी (12 मार्च) मावळ तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी सर्वप्रथम जाहीर कार्यक्रमात तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना घरकुल कार्यारंभ आदेशपत्र वाटप केले. त्यानंतर बारमुख क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या क्रिकेट लीगसाठी स्टेडियमचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांनी केले. ( Pune Guardian Minister Chandrakant Patil Playing Cricket After Inauguration Cricket Stadium In Maval Taluka Visit Video Viral )
हेही वाचा – चांदखेड इथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुल कार्यारंभ आदेशपत्र वाटप
‘स्टेडियममुळे या भागातील खेळाडूंची सोय झाली आहे. याशिवाय येळसे पवनानगर येथील क्रिकेट स्टेडियमचा प्रस्ताव लवकरच मार्गी लावण्यात येणार आहे. इनडोअर आणि आऊटडोअर खेळासाठी आणखी स्टेडियम उभारावे, यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल,’ अशी ग्वाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली.
आज मावळ तालुक्यातील चांदखेडमध्ये बारमुख क्रिकेट स्टेडियमचं उद्वघाटन केलं. याशिवाय वेळसे पवनानगर येथील क्रिकेट स्टेडियमचा प्रस्तावही मार्गी लावण्यात येणार आहे. इनडोअर-आऊटडोअर खेळासाठी आणखी स्टेडियम उभारावे यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली.(१/२) pic.twitter.com/19eHrY9tUw
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) March 12, 2023
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय माळी, सरपंच मीना माळी आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– सोमाटणे टोलनाका कायमस्वरुपी हटवा, किशोर आवारे यांचे बेमुदत उपोषण – व्हिडिओ
– पवना विद्या मंदिर माजी विद्यार्थी सभागृहाचे भूमीपूजन माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते संपन्न, पहिल्या दिवशी तब्बल 7 लाखांची निधी जमा