लायन्स क्लब ऑफ वडगाव यांच्या सौजन्याने व वडगांव नगरपंचायत च्या सहकार्याने माझी वसुंधरा अभियान 3.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत वडगांव शहरात नागरिकांसाठी 2 स्मार्ट टॉयलेट सुरू करण्यात आले. लायन्स क्लब ऑफ वडगांव च्या अध्यक्षा सपना छाजेड यांच्या हस्ते आणि वडगांव चे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पुण्याचे मा नगरसेवक आनंद छाजेड यांच्या संकल्पनेतून प्रातिनिधिक स्वरूपात हा उपक्रम श्रीमंत महादजी शिंदे उद्यानाजवळ सुरू करण्यात आला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नगरसेवक प्रवीण चव्हाण, दिलीप म्हाळसकर, खंडूशेठ भिलारे, प्रसाद पिंगळे, वडगांव विविध कार्यकारी सोसायटीचे व्हा. चेअरमन पंढरीनाथ भिलारे, वडगांव शहर भाजपा सरचिटणीस मकरंद बवरे, एम इ एस इंडस्ट्रीयल कामगार सह. पतसंस्थेचे संचालक संतोष ढोरे, मावळ तालुका भाजपा क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारींगे, नगरपंचायत वडगांव चे स्वच्छ सर्वेक्षण विभागाचे दिगंबर बांडे, नूतन मुथा, शर्मिला खांडके, विजय झनकर आदी मान्यवर उपस्थित होते. ( Smart Toilets Started In Vadgaon Maval City Under Majhi Vasundhara Abhiyan 3.0 And Swachh Survekshan 2023 Through Lions Club of Vadgaon )
हेही वाचा – आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी खासदार बारणेंच्या उपस्थितीत मावळ पंचायत समिती कार्यालयात बैठक संपन्न
इको बडी स्मार्ट सोल्युशन आणि ऑप्टिस्मार्ट इको सोल्युशन या कंपनीने तयार केलेल्या या स्मार्ट टॉयलेट मध्ये माझी वसुंधरा अंतर्गत
जल – पाण्याची बचत : एका वापरासाठी साठी अंदाजे फक्त 1 लिटर पाणी वापर होतो.
पृथ्वी – प्लास्टिक चा पुनर्वापर : हे टॉयलेट प्लास्टिक च्या पुनर्वापर करून तयार केलेल्या पार्टिशन व वापरलेल्या प्लास्टिक पासून बनवलेले आहेत.
अग्नी : सौर ऊर्जा वर देखील हे सुरू राहू शकते असे हे तीन तत्त्व यांत समाविष्ट आहे.
तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत प्लॅटिक चा पुनर्वापर केल्या मुळे 3 आर प्रिन्सिपल समाविष्ट आहे.
नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी आपल्या मनोगतात लायन्स क्लब ऑफ वडगांव च्या उपक्रमांचे कौतुक करत नगरपंचायत देखील लायन्स क्लब ऑफ वडगांव सोबत सेवाकार्ये करण्यासाठी सदैव सहकार्य करेल असे आश्वासन दिले. नगरसेवक प्रविण चव्हाण यांनी आपल्या मनोगतात 5 प्रमुख सूत्रांच्या माध्यमातून विशेषतः पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होणार असल्याने समाधान व्यक्त केले.
हेही वाचा – दहशत माजवण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या वडगाव मावळमधील एकाला पुण्यात अटक । Pune Crime
संवेद खांडके यांनी या प्रकल्पाची संपूर्ण माहिती विशद केली. लायन्स क्लब ऑफ वडगांव चे खजिनदार नंदकिशोर गाडे, संचालक झुंबरलाल कर्णावट, अमोल मुथा, संजय भंडारी, अॅड.चंद्रकांत रावल, संजय गांधी, प्रशांत गुजराणी, आदेश मुथा, वितराग मुथा आदींनी नियोजन केले. स्वागत लायन्स क्लब ऑफ वडगांव च्या अध्यक्षा सपना छाजेड यांनी केले. प्रास्ताविक लायन्स क्लब ऑफ वडगांव चे संस्थापक अध्यक्ष अॅड. दामोदर भंडारी यांनी केले ज्यात त्यांनी लायन्स क्लब ऑफ वडगांव च्या उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन मा नगरसेवक भूषण मुथा यांनी केले. आभार प्रदर्शन संतोष चेट्टी यांनी केले.
अधिक वाचा –
– शास्ती कर माफ करा, ग्रामपंचायत काळातील बांधकामे नियमित करा; वडगाव भाजपाचे नगरपंचायत सीईओंना निवेदन
– छत्रपती शिवरायांचा 393वा शिवजन्मोत्सव सोहळा वडगाव इथे थाटामाटात संपन्न, पुरस्कारार्थ्यांना पुरस्कार प्रदान । Vadgaon Maval