ग्रामपंचायत सुदुंबरे आणि मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच उमाताई राहुल शेळके यांच्या प्रयत्नातून दिनांक 24 फेब्रुवारी 2023 ते 17 मार्च 2023 या दरम्यान आधार सेवा केंद्राचे नियोजन महिला अस्मिता भवन, सुदुंबरे या ठिकाणी करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये सुदुंबरे गावातील तब्बल 1124 ग्रामस्थांचे आधारकार्ड संबंधित विविध काम करण्यात आले. ( Aadhaar Seva Camp In Sudumbre Village Maval 1124 Citizens Availed Various Aadhaar Related Services )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
गावातील लोकांची होणारी गैरसोय तसेच लहान बालकांचे, अबाल वृद्धांचे आणि विद्यार्थ्यांचे आधारकार्डचे काम या कॅम्पद्वारे व्यवस्थितरित्या करून देण्यात आले. याप्रसंगी आधारकार्ड सेवा केंद्राच्या व्यवस्थापिका स्वपना सचिन वामन तसेच त्यांच्या सर्व टीमने अतिशय परिश्रम घेत कर्तव्यनिष्ठपणे हे काम बजावले. त्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा – शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्यासाठी खास तरतूद, ‘या’ कार्यासाठी तब्बल 25 कोटी जाहीर
याप्रसंगी सुदुंबरे गावचे माजी आदर्श सरपंच माणिक मारुतराव गाडे, सुदुंबरे गावचे माजी उपसरपंच जालिंदर जगन्नाथ गाडे, माजी उपसरपंच ताराचंद गाडे, माजी उपसरपंच विश्वनाथ ज्ञानेश्वर आंबोले, सुदूंबरे गावच्या माजी ग्रामपंचायत सदस्या उमाताई राहुल शेळके उपस्थित होते. आधारकार्ड सेवा केंद्राचा लाभ घेतलेल्या व्यक्तींनी या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले.
अधिक वाचा –
– धोकादायकरित्या रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या ट्रकला दुचाकीची धडक; 2 दुचाकीस्वार ठार, मिंडेवाडीजवळील घटना
– ‘प्रशासकीय सेवांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिक असले पाहिजेत’, समर्थ शलाका शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण संपन्न