दिनांक 31 मार्च 2023 रोजी सकाळी 11.45 वाजता लायन्स पॉइंट लोणावळा इथून शिवदुर्गला फोन आला होता की, एक व्यक्ती लायन्स पॉइंट इथे दरीत पडला आहे. याबाबत अधिक माहिती घेऊन लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनलाही कळवण्यात आले. पोलिस निरीक्षक यांनी याला त्वरित प्रतिसाद देत पोलिस पथकासह शिवदुर्ग टीमने घटनास्थळ गाठले. ( Shivdurg Rescue Team Lonavala Lions Point Body Recovery Operation )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
लोणावळा लायन्स पॉईंट रिकवरी ऑपरेशनचा थरार…
शिवदुर्ग रेस्क्यू टीम साहित्यासह घटनास्थळी पोहोचली, तेव्हा एक वाजला होता. शोधकार्यानंतर अर्धा-पाऊण तासात दरीत कोसळेल्या व्यक्तीची बॉडी दिसली. साधारण दोनशे मीटर रॅपलींग केल्यानंतर बॉडी दिसायला लागली त्यानंतर अजून शंभर फुटांपेक्षा जास्त अंतरावर बॉडी होती. त्यामुळे इथे खरा कस लागणार होता.
तोवर इतर तयारी करण्यात आली, खाली बॉडी पॅक करण्यासाठी स्ट्रेचर व इतर साहित्य पाठवण्यात आले. योगेश उंबरे, सुरज वरे यांच्या मदतीला हर्ष तोंडे हा शिवदुर्ग साथी देखील खाली गेला. वरची सर्व जबाबदारी महेश मसने, सचिन गायकवाड यांनी सांभाळली. सेट अप लावला तोवर खाली बॉडी पॅक झाली होती. बॉडी तीव्र उतारावर असल्याने बॉडी पॅकिंगला अडचणी येत होत्या.
पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले यांच्या सह अनेक पोलिस कर्मचारी यावेळी मदतीला होते. घनदाट जंगल, तीव्र उतार जिथे खऱे तर व्यवस्थित उभे ऱ्हायला देखील जागा नव्हती तिथे रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले. बॉडी खेचण्यात कारवीच्या जंगलामुळे मोठी अडचण येत होती.
खालून वॉकीटॉकीवर कॉल आला आणि बॉडी खेचायला सुरुवात करण्यात आले. शंभर फुट खेचल्यानंतर वर खेचण्यासाठी जड जात होते. अजून जोर लावण्यात आला, जोरात आवाज होऊन रोपचा आवटर फाटला गेला. सेट अप चेंज ओव्हर केला आणि जूमार अजुन पुढे लावले परत ओढायला चालू केले तेव्हा परत जोरात आवाज झाला आणि रोपच तुटला. हा त्या घडीचा अत्यंत कठीण प्रसंग होता.
त्यानंतर आदित्य पिलानेला खाली पाठवले, चेकींग गेले तेव्हा रोप गुंडाळून गेला असल्याचे समजले. सुनिल गायकवाड हे देखील खाली एजपर्यंत जाऊन आले. रोप भयंकर गुंडाळून त्याची गुंडाळी अडकत होती. तो गुंता काढण्याचे आदित्यने प्रयत्न केले आणि गुंता सोडवला. नंतर अथक परिश्रमाने हळूहळू बॉडी वर आली. बॉडी पोलिसांच्या ताब्यात दिली आणि परतीच्या प्रवासासाठी आवराआवर केली.
लायन्स पॉइंट शिवदुर्ग रेस्क्यू टीम
महेश मसने, सचिन गायकवाड, हर्ष तोंडे, योगेश उंबरे, सूरज वरे, योगेश दळवी, हर्षल चौधरी, आदित्य पिलाने, प्रिन्स बेठा, आयुष वर्तक, मधुर मुंगसे,
वैभव राऊळ, राजेंद्र कडू, अशोक उंबरे, गणेश रौंदळ, अमित बलकवडे , सदाशिव सोनार, चंद्रकांत गाडे, अशोक कुटे, हनुमंत भोसले, केतन खांडेभरड, संतोष खोसे, अमोल सुतार, सुनील गायकवाड
मयताचे नाव – खेमा बबन घुटे (वय 39 परली, ता.सुधागड, जिल्हा रायग)
शिवदुर्ग रेस्क्यू हेल्पलाईन नंबर – 9822500884
अधिक वाचा –
– मनसे मावळ तालुका कार्ला-कुरवंडे जिल्हा परिषद गटाची नूतन कार्यकारणी जाहीर; पाहा पदाधिकाऱ्यांची संपूर्ण यादी
– वडगाव फाट्यावरील सिल्वर ट्रेझर सोसायटीच्या परिसरात भीषण आग; आपदा मित्राच्या प्रसंगावधानाने टळला मोठा अपघात