तळेगाव दाभाडे शहरामध्ये दर रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी मारूती मंदिर चौक परिसर ते नगरपरिषद इमारत आणि जिजामाता चौक ते सुभाष चौक येथे ट्रॅफिक नियोजन करण्याबाबत भारतीय जनता पार्टी तळेगाव दाभाडे शहराच्या वतीने तळेगाव दाभाडे नगर परिषद मुख्याधिकारी विजय सरनाईक आणि वाहतूक विभाग सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल गजरमल यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. त्यावर पुढील रविवारपासून फरक जाणवेल, असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. ( BJP Letter To Traffic Police Department To Resolve Traffic Jams Problem In Market Of Talegaon Dabhade City )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच, तळेगाव दाभाडे शहरातील गावठाण भाग येथे कमी दाबाने आणि अनियमित वेळांवर पाणीपुरवठा होत असल्याने विशेषतः महिला भगिनींना आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात काही तांत्रिक अडचणी असतील तर त्यांचे निराकरण करण्यात यावे आणि पाणी सोडण्याचे त्या त्या भागाचे वेळापत्रक जाहीर करावे, जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही, अशीही मागणी भाजपाच्या शिष्टमंडळाने केली. तळेगाव दाभाडे शहरातील विविध समस्यांबाबत संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याची सूचना मुख्याधिकारी विजय सरनाईक यांनी दिल्या.
हेही वाचा – तळेगाव दाभाडे येथील लिंब फाट्यावर अपघात प्रतिबंधक उपाययोजना म्हणून सेफ्टी बॅरिअर आणि चॅनेलायझर
सदर शिष्टमंडळात भाजपा तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने, नगरसेविका शोभा भेगडे, सरचिटणीस श्रीमती रजनी ठाकूर, शोभा परदेशी, सोशल मीडिया अध्यक्ष उपेंद्र खोल्लम, व्यापारी आघाडी अध्यक्ष निर्मलशेठ ओसवाल, ओबीसी मोर्चा कार्याध्यक्ष सचिन जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी अध्यक्ष अनिल वेदपाठक, प्रसिद्धी प्रमुख विशाल जव्हेरी, कामगार आघाडी सरचिटणीस आतिश रावळे, ओबीसी मोर्चा प्रसिद्धी प्रमुख अमित भागीवंत, व्यापारी आघाडी सरचिटणीस ऋषिकेश नागे हे उपस्थित होते.
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 73 कोटी 60 लाख रुपये नुकसान भरपाई, मावळमधील 114 शेतकऱ्यांचा समावेश
– अर्ध्या कड्यावर बॉडी आली आणि रोपचा गुंता झाला; लायन्स पॉइंट येथील बॉडी रेस्क्यूचा थरार!! शिवदुर्गच्या अथक प्रयत्नांना सलाम