पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या संख्येने अनधिकृत होर्डिंग आहेत. त्याकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. अनधिकृत होर्डिंग काढण्यासाठी निविदा काढण्यात आली. पण, न्यायालयाचे कारण पुढे करून महापालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे. शहरातील सगळे अनधिकृत होर्डिंग काढण्यात यावे. ज्या होर्डिंगला परवानगी आहे त्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करावे, अशी सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका आयुक्तांना केली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, वादळी वा-यासह होणाऱ्या पावसापासून बचाव करण्यासाठी आडोशाला थाबलेल्या व्यक्तीच्या अंगावर किवळे येथे होर्डिंग पडल्याने पात जणांचा मृत्यू झाला. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. यात मृत व जखमी झालेले व्यक्ती हे सर्वसाधारण कुटुंबातील आहे. त्यांच्या कुटुंबियांना राज्यशासनाने मदत केली आहे. पण, महापालिकेने ही काही मदत करावी. ( Hoarding Accident Case deliberate neglect of municipal administration towards unauthorized hoardings in city said mp shrirang barane )
“शहरात अनाधिकृत होर्डिंगचे पेव फुटले आहे. शहराच्या सर्व भागात होर्डिंग दिसतात. त्यातील जवळपास 2200 होर्डिंग हे अनाधिकृत आहेत. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता शहरात असे होर्डिंग उभारले जात आहेत. याकडे महापालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. यामध्ये प्रशासन व अनाधिकृत होर्डिंग मालक याचे आर्थिक देणेघेणे असल्याचे दिसून येते, यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. शहरातील अनधिकृत होर्डिंग काढण्यासाठी निविदा काढण्यात आली होते. केवळ न्यायालयाचे कारण पुढे करून महापालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे.”
हेही वाचा – दुर्दैवी! जिथे आडोसा घेतला तिथेच काळाने घाला घातला, किवळे इथे होर्डिंग्ज कोसळून 5 जण ठार
शहरातील सगळे अनधिकृत होर्डिंग काढण्यात यावे. ज्या होर्डिंगला परवानगी आहे त्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करावे. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पुरेशी काळजी घ्यावी. किवळे येथील दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी. जखमींचा पूर्ण खर्च महापालिकेने करावा. यापुढे महापालिकेने मुख्य चौकांमध्ये अपघात होईल अथवा नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा ठिकाणी होर्डिंगला परवानगी देऊ नये, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली. ( Hoarding Accident Case deliberate neglect of municipal administration towards unauthorized hoardings in city said mp shrirang barane )
अधिक वाचा –
– ‘अनधिकृत होर्डिंग्ज उभारणाऱ्यांवर आणि त्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी’ – आमदार सुनिल शेळके
– ‘जीवात जीव तोवर राष्ट्रवादीतच…कुणाच्याही सह्या घेतलेल्या नाहीत…माझ्याविषयी होत असलेल्या चर्चांमध्ये तथ्य नाही’ – अजित पवार