पुणे : कृषि क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल कृषि विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी शेतकरी, संस्था, गट आदींनी 30 जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राज्य शासन कृषि विभागामार्फत राज्यात कृषि आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या, कृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट यांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यामध्ये डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, सेंद्रीय शेती कृषिभूषण, उद्यानपंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, युवा शेतकरी पुरस्कार व कृषि विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते. ( Agriculture Award 2022 through State Government Agriculture Department Pune Maharashtra )
#कृषि क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल कृषि विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी शेतकरी, संस्था, गट आदींनी ३० जूनपर्यंत अर्ज करावेत.अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा- राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांचे आवाहन
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) April 24, 2023
कृषि विभागामार्फत 2022 या वर्षासाठी कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकरी गट, संस्था, व्यक्तींनी आपले प्रस्ताव नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे दिनांक 30 जुन 2023 पर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– ‘वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा’ : IPS सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्पनेतून गडकिल्ले स्वच्छता अभियान
– मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : “राजकीय पक्षाचा प्रचार करणाऱ्या सचिवावर त्वरित कारवाई करा”, भेगडेंच्या पत्राने खळबळ