येत्या जून महिन्यात मान्सूनचे आगमन होणार असून काही दिवसांतच पावसाळा सुरू होणार असल्याने वडगाव नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रातील सर्व ओढे-नाले साफसफाईच्या सर्व कामांना दरवर्षी प्रमाणे पावसाळ्यापूर्वी सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी नाले साफसफाई कामांची पाहणी केली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच वडगाव नगरपंचायत प्रशासनाकडून शहरातील काही उघडी गटारे साफ करणे, कचरा व्यवस्थापन तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत काढण्यासंदर्भात नगरपंचायत मधील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर, मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम यांनी सूचना दिल्या आहेत. ( vadgaon nagar panchayat has started cleaning streams and drains in city before monsoon )
शहरातील कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होऊ नये. यासाठी मुख्य बाजारपेठेसह व अन्य भागात रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या हटविण्यात येणार असून जेणेकरुन कोणताही अपघात किंवा समस्या उद्भभवणार नाहीत. याशिवाय महावितरण कंपनीने पावसाळ्यापूर्वी नादुरुस्त असलेल्या विद्युत वाहिन्या त्वरीत दुरुस्त करण्यासंदर्भात महावितरण विभागाला नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी निवेदन दिले असून येत्या दोनच दिवसांत वीज वितरण कंपनीने संबंधित कामांना सुरुवात करणार असल्याचे कळविले आहे.
अधिक वाचा –
– किशोर आवारे हत्या प्रकरण : 6 आरोपींना 20 मे पर्यंत पोलिस कोठडी, गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी विशेष पथक । Kishor Aware Murder Case
– बेकायदा दारू विक्री करणाऱ्यांना लोणावळा शहर पोलिसांचा दणका! लाखोचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा