मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) शिक्षक संजय ओव्हाळ ( Sanjay Ovhal ) यांना पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ आणि जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी यांच्या वतीने जिल्हा पातळीवरील गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संजय ओव्हाळ हे ग्रामीण भागातील वारू कोथुर्णे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत. यावेळी पुरस्कार समारंभात भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे उपस्थितीत होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
संजय ओव्हाळ हे गेली 22 वर्षापासुन ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. सुरवातीच्या काळात सदर विद्यालय हे विनाअनुदानित तत्त्वावर चालत होते. अशा प्रसंगी अल्पसे मानधन असूनही इतर कोणत्याही बाबतीचा विचार न करता फक्त गुणवंत विद्यार्थी घडवणे हे ध्येय उराशी बाळगून निघालेले संजय ओव्हाळ यांनी आपल्या सहकारी शिक्षकांच्या मदतीने शाळेस गुणवत्तेच्या उच्च पातळीवर नेऊन ठेवले.
ग्रामीण भागातील मुलींना शाळेच्या प्रवाहात जोडण्याचे व पालकांना मुलींच्या शिक्षणाप्रति मार्गदर्शन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. आज त्यांचे विद्यार्थी अनेक महत्त्वाच्या ठिकाणी कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत मुख्याध्यापक संजय ओव्हाळ यांनी मांडले. ( Sanjay Ovhal Sir Honored With Meritorious Principal Award Varu Kothurne School Maval )
अधिक वाचा –
भडवली शाळेतील आदर्श शिक्षक ज्ञानेश्वर शिवणेकर यांना मावळ पंचायत समितीचा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार
आदर्श शिक्षक मारुती ठोंबरे यांच्या प्रयत्नातून तुंग शाळेला पंचायत समितीचा ‘उपक्रमशील शाळा पुरस्कार’