Dainik Maval News : ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आंचल मोरे हिची 63 व्या नॅशनल फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे. आंचल ही मावळमधून निवड होणारी पहिली मुलगी असून तिच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
ही राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा महाराष्ट्र शासन व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असून यात भारतातील 36 राज्यांचे संघ सहभागी होणार आहेत. आंचलच्या मेहनतीला मिळालेलं हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. मावळवासीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा लोणावळा शहरात सर्वपक्षीयांकडून तीव्र निषेध । Lonavala News
– पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ वडगाव मावळ येथील सर्वपक्षीय मशाल रॅली । Vadgaon Maval
– कामशेतमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून पहलगाम येथील क्रूर हल्ल्याचा जाहीर निषेध । Kamshet News