व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील अपघातग्रस्त टँकर हटवला, वाहतूक पूर्ववत होण्यास सुरूवात ; लोणावळ्यात मात्र पुन्हा वाहतूककोंडी

मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगदा येथे केमिकलने भरलेला टँकर पलटी झाल्याने तब्बल ३२ ते ३३ तास वाहतूक कोंडी झाली होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 5, 2026
in देश-विदेश, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
Accident hit tanker on Mumbai-Pune Expressway removed traffic begins to resume but traffic jams in Lonavala

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगदा येथे केमिकलने भरलेला टँकर पलटी झाल्याने तब्बल ३२ ते ३३ तास वाहतूक कोंडी झाली होती. तब्बल २५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवाशांचे यात अतोनात हाल झाले. परंतु बुधवारी रात्री उशीरा अपघातग्रस्त कंटेनर हटवून द्रुतगती मार्गावरील मुंबई पुन्हा वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. दरम्यान महामार्गावरील वाहतूक पूर्ववत होत असताना लोणावळ्यात मात्र एका बंद कंटेनरमुळे पुन्हा वाहतूककोंडी झाल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा परिसरात एक सिमेंटचा कंटेनर तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यातच बंद पडला. यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे मंदावली आहे. महामार्ग पोलीस आणि आयआरबीची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. क्रेनच्या साहाय्याने हा कंटेनर बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, तोपर्यंत वाहनांचा ओघ वाढल्याने वाहतूक कोंडीत भर पडली आहे.

खंडाळा घाटातील ३२ तासांच्या खंडानंतर रात्री उशिरा वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र, अनेक वाहनचालकांना याची कल्पना नसल्याने आणि प्रचंड कोंडीमुळे वैतागलेले चालक आपल्या वाहनातच झोपून गेले होते. सकाळी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करताना पोलिसांना या वाहनचालकांना झोपेतून उठवून गाड्या पुढे नेण्यास सांगावे लागले.

सध्या लोणावळ्यापासून २० किलोमीटर आधीपासूनच वाहने अडकून पडली आहेत. त्यामुळे परिस्थिती इतकी गंभीर आहे की गेल्या दोन तासांत अनेक वाहने जेमतेम दोन किलोमीटर पुढे सरकू शकली आहेत. मावळ परिसरातून एक्सप्रेस वेवर येणाऱ्या प्रवाशांना या भीषण कोंडीचा सामना करावा लागत आहे. लोणावळ्याजवळ अजूनही ५ ते १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा कायम आहेत.

मावळ परिसरात परिस्थिती गंभीर
टँकर हटवल्यानंतरही या महामार्गावरील कोंडीचे परिणाम पुणे जिल्ह्यातील मावळ परिसरात प्रकर्षाने जाणवत आहेत. लोणावळा ते तळेगाव या पट्ट्यात वाहने संथ गतीने पुढे सरकत आहेत. एक्सप्रेस वेवरील कोंडी टाळण्यासाठी अनेक चालकांनी जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचा आधार घेतला. मात्र तिथेही वाहनांची प्रचंड गर्दी झाल्याने हा मार्गही ठप्प झाला आहे.

वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच, रस्त्याच्या कडेला किंवा मधोमध वाहन उभे करून झोपू नका, जेणेकरून वाहतुकीचा प्रवाह सुरू राहण्यास मदत होईल, अशी विनंतीही करण्यात आली आहे. बोरघाटातील वाहतूक हळूहळू मूळ पदावर येत असली तरी मावळ आणि लोणावळ्यातील वाहनचालकांना मात्र अद्याप मनस्ताप सहन करावा लागत आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेला शाप ! दादा – आबा – साहेब … अनेक दिग्गजांनी घेतलीये अकाली एक्झिट
– मावळची विकासरेखा हरवली ! मावळ विधानसभेच्या माजी आमदार रुपलेखा ढोरे यांचे अल्प आजाराने निधन
– महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ पंचतत्वात विलीन.. लाखो चाहते कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना साश्रूनयनांनी अखरेचा निरोप
– Photo : अजित दादा पवार यांचे कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो


dainik maval jahirat

Previous Post

मुंबई-पुणे-द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल

Next Post

मावळ तालुक्यात टाकवे बुद्रुक येथे १२ लाख ६० हजारांची कॅश जप्त – निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Cash worth 12 lakhs seized at Takve Budruk in Maval taluka Election Commission flying squad action

मावळ तालुक्यात टाकवे बुद्रुक येथे १२ लाख ६० हजारांची कॅश जप्त - निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval BJP threatens Bakasur Bhagao agitation administration given seven-day deadline to fill potholes

मावळ भाजपाचा ‘बकासूर भागो’ आंदोलनाचा इशारा ; रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाला सात दिवसांची मुदत

August 12, 2026
issue of highly vulnerable villages in Maval has reached ministry rehabilitation of Patan village is confirmed

मावळच्या अतिधोकादायक गावांचा प्रश्न थेट मंत्रालयात धडकला ; पाटण गावचे पुनर्वसन निश्चित, इतर आठ गावांचे दहा दिवसांत सर्वेक्षण

August 12, 2026
Lonavala Kumar Chowk to Tiger Point road project PMRDA Abhijit Chaudhari MLA Sunil Shelke on-site inspection

लोणावळा कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याला मिळणार गती ; पीएमआरडीए आयुक्त अभिजीत चौधरी, आमदार सुनील शेळके यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा

August 12, 2026
Traffic diversions for three hours on Connecting Link Missing Link of Mumbai-Pune Expressway

महत्वाची बातमी ! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’वर (मिसिंग लिंक) बुधवारी तीन तास वाहतूक बदल

August 11, 2026
Individual found in possession of cannabis apprehended within Lonavala Rural Police Station limits

Lonavala Police : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

August 11, 2026
Four youths from Maval Taluka Pune died in an accident on Pune-Satara highway at Shirwal

Shirwal Satara Road Accident : शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू

August 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.