मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठा अपघात झाला आहे. खोपोली पोलिस स्टेशन हद्दीत किलोमीटर 38.00 दरम्यान मुंबई लेनवर हा अपघात घडला. या अपघातात अनेक गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ( Breaking Accident on Mumbai Pune Expressway Five Vehicles Hit By Truck )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, मुंबई पुणे एक्सप्रेस वेववर किलोमीटर 38.00 च्या दरम्यान मुंबई लेनवर हा अपघात झाला. एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने अनेक वाहनांची धडक झाली. या विचित्र अपघातात जवळपास चारहून अधिक वाहनांचे मोठे नुकसान झाले तर वाहनांमधील काहीजण जखमी झाले. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही.
अपघातास कारणीभूत झालेला ट्रक घेऊन चालक पुढे पळून गेला. मात्र पोलिसांनी त्याला पकडले असून ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. आयआरबी, महामार्ग पोलिस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्था यांनी घटनास्थळी तत्काळ मदत कार्य केल्याने वाहतूक सुरळीत झाली.
अधिक वाचा –
– लोणावळा जवळील वलवण पुलावर टेम्पोची अज्ञात वाहनाला धडक, टेम्पो चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू
– दुपारची लोकल रेल्वे सेवा पुर्ववत करा, तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनवर आंदोलन
– Video : कार्मेल कॉन्व्हेंट खोपोली येथे लायन्स क्लबच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन