आज सोमवारी (दिनांक 2 ऑक्टोबर) मध्यरात्री बारा ते सव्वा बाराच्या सुमारास मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वर पुणे कडील लेनवर किलोमीटर 43.000 या ठिकाणी एका व्यक्तीला अज्ञात गाडीची ठोकर बसल्याने तो रस्त्याचे कडेला पडला. त्याला तातडीने ॲम्बुलन्स मधून खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. ( Accident on Pune lane of mumbai pune expressway youth killed in collision with unknown vehicle )
प्राप्त माहितीनुसार, गाडी क्रमांक MH -12 – BC – 1358 वरील ड्रायव्हर तेजस तांदळे (रा. पुणे) हा आपली कार घेऊन पुणेकडे जात असताना KM 43.000 इथे आले असता ट्रॅफिक जॅम मुळे गाडी थांबली. गाडीतील त्याचा मित्र लक्ष्मीकांत अरुण चव्हाण (वय 30) हा बाथरूम आल्याने तो रोड क्रॉस करून मुंबई लेन कडे गेला होता. तो परत येत असताना त्यास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो रोडवर पडला आणि त्याला यास गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाली आणि त्याच्या नाकातून रक्त आल्याने त्यास उपचारासाठी ॲम्बुलन्स मधून खोपोली नगरपालिका हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलेले होते. मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
सदर घटनेची माहिती खोपोली पोलीस ठाणे येथे देण्यात आली आहे. महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाटचे पोलीस उप निरीक्षक अनिल शिंदे यांच्या टीमने या वेळी मदतकार्य केले. आय.आर.बी. पेट्रोलिंग आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी देखील मदत कार्यात सहभाग घेतला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– लायन्स पॉईंट इथे दरीत कोसळलेल्या ‘त्या’ व्यक्तीचा मृतदेह सापडला । Lonavala News
– भाजपाची बूथ सशक्तीकरणासाठी देहूरोड इथे बैठक; मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांचे मार्गदर्शन
– खासदार श्रीरंग बारणे यांची निर्दोष मुक्तता! अनधिकृत बांधकाम कारवाई विरोधात 10 वर्षापूर्वी पुकारले होते आंदोलन