अदिवासी समाजातील मुलींसाठीच्या शासकीय वसतिगृहात राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तोफखान पोलिसांनी (अहमदनगर) अत्याचार करणाऱ्या आरोपी तरुणाला लोणावळा (पुणे) येथून अटक केली आहे. तसेच, पीडित अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे.
विश्वनाथ चिमाजी गडदे (वय 32 रा. गडदे आखाडा, राहुरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने आरोपी तरुणाला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ( Accused Who Abducted Minor Girl From Rahuri And Tortured Her Arrested From Lonavala Pune )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, वसतिगृहात राहणारी राहुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलगी दिनांक 2 फेब्रुवारीपासून बेपत्ता होती. याप्रकरणी तोफखान पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल आणि गुन्हा दाखल झाला होता. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जे. सी. मुजावर हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. त्यांच्यासह अंमलदार प्रदीप बडे यांनी पीडित मुलीला पळवून नेणार्या आरोपी तरुणाचे लोकेशन काढून त्याला लोणावळा येथून ताब्यात घेतले. त्यानंतर पीडित मुलीच्या जबाबावरून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! लोणावळा पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी, 342 पोती गुटख्यासह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी ताब्यात
– जितेंद्र आव्हाडांविरोधात लोणावळ्यात भाजपा युवामोर्चा आक्रमक, आव्हाडांचा पुतळा जाळून नोंदवला निषेध