लोणावळा परिसरात जुन्या पुणे मुंबई हायवेवरील मळवली, कार्ला भाजे परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी येत असतात. शनिवार, दिनांक 19 ऑगस्ट रोजी मौजे भाजे आणि मनशक्ती केंद्र, वरसोली परिसरामध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून गाडीतील मौल्यवान बॅगांमधील रोख रक्कम, मोबाईल इतर मौल्यवान वस्तू इ. कुणीतरी अज्ञात चोरट्याने लंपास केल्या. याबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. ( Accused who broke windows of tourists vehicles and stole them was arrested in 3 hours by Lonavala Rural Police )
याबद्दल अधिकची माहिती जाणून घेत लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार नितेश कवडे आणि पोलीस नाईक गणेश होळकर यांचे पथक रवाना झाले. सदर पथकाने घटनेच्या अनुषंगाने आरोपीचा व गाडीचा शोध घेण्यासाठी प्रथम मनशक्ती केंद्र वरसोली येथे घडलेल्या घटनेच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पाहाणी केली. त्यावेळी सदर फुटेजमध्ये इनोव्हा सहृष्य कारमधील 30 ते 35 वयाचा अंगात चॉकलेटी रंगाचा टी शर्ट घातलेला इसम हा चारचाकी गाडीची काच फोडून चोरी करताना आढळल्याने पोलीसांनी सदर संशयीत इनोव्हा कारचा वरसोली, कार्ला, मळवली, भाजे व लोहगड परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली.
त्यावेळी काळ्या काचा असणारी टोयोटा कंपनीची इनोव्हा कार (क्रमांक 31 06 ए 3806 ) ही मौजे भाजे धबधबा नंबर 2 परीसरात संशयीत रित्या फिरत असताना मिळुन आल्याने पोलिसांनी कारचालकाची चौकशी केली. त्यावेळी चालक नाव – अखिल सलीम व्होरा (वय 32, रा. नुतन नगर अमिना मंजील जवळ, आनंद, गुजरात 388001) असे सांगीतले. पोलीसांनी सदर कारची झडती घेतली असता नमुद कार चालकाकडे इनोव्हा गाडीमध्ये सीमकार्ड नसलेले एकुण 6 मोबाईल, तसेच 5 पर्स, 2 बॅगा, 2 पॉवर बँक, 2 घड्याळे, 22,900 रोख रक्कम आणि इनोव्हा कार असा एकुण 12,11,100 रुपये मुद्देमाल मिळुन आला.
पोलीसांनी अधिक चौकशी केली असता सदर माल आणि रोख रक्कम ही काही गाड्यांच्या काचा फोडून चोरी केली असल्याचे त्याने कबूली दिली. त्यानंतर त्यास पुढील चौकशीसाठी पोलीस स्टेशन इथे आणले. सदर चोरीच्या घटनेबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन इथे दाखल दोन्ही गुन्ह्यात भादवि 379,427 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपीकडून जप्त केलेल्या वस्तुंमध्ये सदर दोन्ही गुन्ह्यातील तक्रारदार यांच्या वस्तु मिळुन आलेल्या आहेत. तसेच सदर आरोपीला गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने दिनांक 22 ऑगस्ट पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे.
लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन व्यतिरिक्त यापुर्वी लोणावळा शहर, कामशेत पोलीस स्टेशन हद्दीत देखील अशा प्रकारचे गुन्हे घडलेले असुन अशा गुन्ह्यांचा कसोशीने तपास करुन गुन्हे उघडकीस आनण्याबाबत सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तीक यांनी सर्व पोलीस पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी आणि अंमलदार यांना सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत सदरचे दोन गुन्हे घडताच लोणावळा ग्रामीण पोलीसांनी तत्परता दाखवून यातील गुन्हेगारास शिताफीने अटक करुन दोन्ही गुन्हे तात्काळ उघडकीस आणले आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, सहाय्यक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तीक व वरीष्ठ पोलीस निरीक्षक लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, सहा. फौजदार युवराज बनसोडे, पोलीस हवालदार नितेश कवडे, पोलीस नाईक गणेश होळकर, पोलीस हवालदार बाळकृष्ण भोईर, पोलीस हवालदार विजयभाऊ मुंढे यांचे पथकाने केलेली असुन गुन्ह्यांचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत. ( Accused who broke windows of tourists vehicles and stole them was arrested in 3 hours by Lonavala Rural Police )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– “मावळ तालुक्यातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी मी कटिबद्ध” : आमदार सुनिल शेळके यांचा पवन मावळवासीयांना शब्द
– आपण चंद्रावर पोहोचलो पण रोजच्या जातीय द्वेषाचे, जातीवादाचे काय? प्रकाश आंबेडकर यांचा रोकडा सवाल!
– ‘मावळ आपलाच…समझनें वालों को इशारा काफी’, काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचे शिवसेना – भाजपा – राष्ट्रवादीला खुले आव्हान