व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! पवनानगर भागातील जुगार अड्ड्यांवर IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त

लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 26, 2023
in लोकल, ग्रामीण
Crime

File Photo : Crime


पवनानगर : लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत पवनानगर येथील एका खाजगी घरामध्ये आणि पोल्ट्री फॉर्ममधे अशा दोन ठिकाणी पत्यांचा जुगार अड्डा चालु आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

ह्या माहितीवरुन सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी सोमवारी (दिनांक 25 डिसेंबर) रोजी त्यांच्या कार्यालयाकडील डीबी पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले असता पवनानगर इथे 1) दुर्गा माता मंदिराचे शेजारी एका बंद पत्र्याचे शेडमध्ये आणि 2) एम्पायर हॉटेलचे पाठीमागे, काले गावच्या हद्दीमध्ये एका पोल्ट्री फार्ममध्ये अशा दोन ठिकाणी वेगवेगळ्या वेळी पथकाने टाकलेल्या छाप्यात एकूण 15 व्यक्ती हे जुगार खेळताना मिळून आले.

सदरच्या कारवाईत रोख रक्कम आणि अन्य मुद्देमाल असा एकूण रू 7 लाख 5 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी दिलेल्या फिर्यदिवरून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम चे विविध कलमान्वये दोन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.

सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोसई भारत भोसले, पोहवा सागर बनसोडे, पोहवा नितेश (बंटी) कवडे, पोहवा/सचिन गायकवाड, पोकॉ रईस मुलानी, सिद्धेश वाघमारे व लोणावळा ग्रामीण स्टेशन कडील पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने केली आहे. ( Action by Lonavla Police IPS Satyasai Karthik team on gambling dens in Pavananagar area )

अधिक वाचा –
– वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचांसह सदस्यांनी घेतली आमदार शेळकेंची भेट; आमदारांनी दिला मोलाचा सल्ला!
– शेतात जाणारा रस्ता अडवलाय? थेट तहसीलदारांकडे करा तक्रार; प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असावा असा ‘मामलेदार कोर्ट कायदा’
– मावळ लोकसभेसाठी भाजपाने कंबर कसली! पिंपरी-चिंचवड शहरात भाजपा कोअर कमिटीची बैठक संपन्न, निवडणूकीसाठी केले खास नियोजन


Previous Post

मावळ तालुका महाविकास आघाडीची बैठक संपन्न! आगामी निवडणूका आणि तालुक्यातील प्रश्नांवर चर्चा

Next Post

लोणावळ्यात व्यापाऱ्यांवर झालेल्या मारहाणप्रकरणी दोषींवर कडक कारवाईची मागणी, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
lonavala-bjp-police

लोणावळ्यात व्यापाऱ्यांवर झालेल्या मारहाणप्रकरणी दोषींवर कडक कारवाईची मागणी, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.