Dainik Maval News : शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिरगाव आणि पुसाणे गावात सुरू असलेल्या दारूभट्ट्यांवर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने कारवाया केल्या. यामध्ये सुमारे 17 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. या कारवाया रविवारी (20 एप्रिल) करण्यात आल्या.
पहिली कारवाई शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर करण्यात आली. पातालसिंग हमराज राजपूत (वय 32, शिरगाव, मावळ) याने पवना नदीच्या काठावर दारूभट्टी लावली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने दारूभट्टीवर कारवाई केली. या कारवाईमध्ये 16 लाख 34 हजार 885 रुपये किमतीचे 46 हजार 711 लिटर रसायन नष्ट करण्यात आले. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दुसरी कारवाई मावळ तालुक्यातील पुसाणे गावात करण्यात आली. एका महिलेने गावातील ओढ्यालगत दारूभट्टी लावली होती. गुन्हे शाखा युनिट 5 ने या दारूभट्टीवर कारवाई केली. या कारवाईमध्ये 84 हजार रुपये किमतीचे रसायन नष्ट करण्यात आले आहे. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी महिला पळून गेली. या प्रकरणी पोलीस अंमलदार धनंजय भोसले यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार