व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोकाभिमुखतेचा नवा आदर्श ; आमदार सुनील शेळके यांच्या ‘जनता दरबार’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । MLA Sunil Shelke

सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात नागरिकांनी विविध प्रकारच्या समस्या आमदारांसमोर मांडल्या.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 23, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Maval Citizens spontaneous response to MLA Sunil Shelke Janata Darbar initiative

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आमदार सुनील शेळके यांच्या जनता दरबार या उपक्रमाला गेल्या साडेपाच वर्षांपासून सातत्याने प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दर सोमवारी वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात आयोजित होणाऱ्या या दरबारात मावळ तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक आपल्या समस्या मांडण्यासाठी येतात.

सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात नागरिकांनी विविध प्रकारच्या समस्या आमदारांसमोर मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधांशी संबंधित तक्रारींचा समावेश होता. खराब रस्ते, गटारांची अकार्यक्षमता, पाणीपुरवठ्यातील अडचणी तसेच बंद असलेल्या स्ट्रीटलाईट्सबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

  • घरकुल योजनांत अपात्र ठरणे, परवानग्यांमध्ये होणारा विलंब, तसेच बेकायदेशीर बांधकामांबाबत कारवाईची मागणीही करण्यात आली. आरोग्य सेवा सुधारण्याची गरज, औषधांचा तुटवडा, तसेच आरोग्य शिबिरांच्या आयोजनाची मागणी याही नागरिकांनी यावेळी स्पष्टपणे मांडल्या.

शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांच्या कमतरतेकडे लक्ष वेधले गेले, तर शिष्यवृत्तीसंबंधी तांत्रिक अडचणी आणि शाळा-महाविद्यालयांच्या सुविधांमध्ये सुधारणा व्हावी, अशी मागणी झाली. पोलिस प्रशासनाकडून होणारे दुर्लक्ष, गुन्हेगारी वाढ, घरफोडी व चोरीसारख्या घटनांविषयीही नागरिकांनी चिंता व्यक्त केली.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी, पात्र असूनही नाव न येणे किंवा लाच मागितल्याच्या घटना याही निदर्शनास आणून देण्यात आल्या. वयोवृद्ध, अपंग व विधवा नागरिकांनी निवृत्तीवेतन, आधार कार्डातील त्रुटी, व बँक खात्यांशी संबंधित अडचणी मांडल्या.

रोजगाराच्या संधींचा अभाव, स्वयंरोजगारासाठी कर्ज मिळण्यात अडथळे, तसेच जमिनीच्या मालकीहक्क, हस्तांतरण व वादासंबंधी तक्रारी देखील मांडण्यात आल्या. सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा अपुऱ्या असल्याने प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबतही नागरिकांनी आवाज उठवला. या समस्या ऐकून आमदारांनी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

या दरबाराचे वैशिष्ट्य म्हणजे, तालुक्यातील सर्व शासकीय विभागांचे अधिकारी देखील यासाठी बोलावले जातात. त्यामुळे अनेक समस्या त्याच ठिकाणी आणि तत्काळ मार्गी लावल्या जातात. आतापर्यंत तब्बल 250 हून अधिक आठवडे सलगपणे चाललेल्या या उपक्रमामुळे लोकांना विश्वास वाटतो की, त्यांची अडचण कुणीतरी ऐकणारे आहे.

  • सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत आमदार शेळके स्वत: जनतेसमोर उपस्थित राहून नागरिकांच्या अडचणी शांतपणे ऐकून घेतात, त्यांचा सखोल विचार करतात आणि संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तोडगा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. एखाद्या कामाला वेळ लागणार असल्यास तेही स्पष्टपणे सांगतात; तसेच काम शक्य नसेल तर तसेही स्पष्ट करतात.

कधी कधी काही अपरिहार्य कारणास्तव आमदार सुनील शेळके यांना सोमवारी उपस्थित राहणे शक्य होत नसते. अशा वेळी नागरिकांना याची पूर्वकल्पना दिली जाते. त्यामुळे फक्त काही मोजक्या सोमवार वगळता हा उपक्रम दर सोमवारी अखंडपणे सुरू आहे.

या उपक्रमात लहान मुले, महिलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील लोक सहभागी होतात. जनता दरबार हा एक प्रकारचा लोकशाहीचा प्रत्यक्ष अनुभव देणारा संवादमंच ठरला आहे.

या लोकोपयोगी आणि लोकाभिमुख उपक्रमामुळे आमदार सुनील शेळके यांची सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ अधिक दृढ झाली आहे. लोकांशी थेट संवाद, पारदर्शकता आणि कामाचा सातत्यपूर्ण प्रयत्न या तीन आधारस्तंभांवर उभा असलेला जनता दरबार हा मावळ तालुक्यात लोकप्रतिनिधित्वाचा आदर्श ठरतो आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार


dainik maval jahirat

Previous Post

मोहितेवाडी येथे मोठी घरफोडी ; 3 लाख 65 हजारांची रोकड आणि दागिने लंपास । Maval Crime

Next Post

शिरगाव पोलीस ठाणे हद्दीतील दोन दारू भट्ट्यांवर कारवाई, 17 लाखांचा मुद्देमाल नष्ट । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shirgaon-Police-Station

शिरगाव पोलीस ठाणे हद्दीतील दोन दारू भट्ट्यांवर कारवाई, 17 लाखांचा मुद्देमाल नष्ट । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MP Shrirang Barne inspects paddy cultivation in Maval taluka

मावळ तालुक्यातील भात शेतीची खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून पाहणी

October 29, 2026
Distribution of books to students on occasion of birth anniversary of late Pandharinath Satkar kanhe maval

स्व. पंढरीनाथ हरिभाऊ सातकर यांच्या जयंतीनिमित्त १५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुस्तकसंचांचे वाटप

October 28, 2026
Successful follow-up by Bala Bhegade government takes positive step toward declaring Maval drought-affected taluka

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा यशस्वी पाठपुरावा; मावळ दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर होण्याच्या दिशेने शासनाचे सकारात्मक पाऊल

October 27, 2026
Ravindra Bhegade met with CM devendra fadanvis to request an early meeting regarding Pavana farmer

पवना धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर लवकर बैठक घेण्याबाबत रवींद्र भेगडे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

October 27, 2026
Prize distribution ceremony for Late Suryakant Kaka Walunj Memorial Drawing Competition talegaon dabhade

सात हजार विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा गौरव! कै. सूर्यकांत काका वाळुंज स्मृती चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

October 26, 2026
Document registration Dast Nondani

सामायिक सातबारा असलेल्या जमिनींच्या विक्रीसाठी राज्यात नवा नियम; यापुढे ‘ही’ कागदपत्रे नसल्यास दस्त नोंदणी होणार नाही

October 25, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.