जानेवारी 2023 या एकाच महिन्यात 110 गुन्हेगारांवर मोक्का ( MCOCA ) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील संघटीत गुन्हेगारी टोळ्यांचे गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांची परिणामकारक कारवाई करण्यात आली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्यांवर जरब बसवण्यासाठी सर्व पोलीस ठाणे, प्रभारी अधिकारी यांना पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया आणि अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी सक्त सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने मागील काही दिवसांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचे रेकॉर्ड अद्यावत करून त्यांच्यावर विविध पोलीस ठाणेंकडून आणि गुन्हे शाखेकडून आढावा घेवून त्यांच्यावर कशा प्रकारे कारवाई करावी, याचा विचार करून त्यांच्यावर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे 7 प्रस्ताव सादर करण्यात आले होते. ( Action Under MCOCA Against 30 People In Talegaon Dabhade Police Thane 110 Criminals Nabbed In Pimpri-Chinchwad Police Commissionerate Limits )
त्यावर पोलीस उप-आयुक्त यांच्या अभिप्रायानंतर अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी सदर टोळ्यांवर दाखल असलेल्या 07 गुन्ह्यांमध्ये मोका कायद्याच्या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश पारित करण्यात आले असून एकूण 110 गुन्हेगारांवर मोका कायद्यांतर्गत कारवाई करून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. 1 गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई करून कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.
मोका कारवाई करण्यात आलेल्या टोळ्यांची माहिती,
1 चिंचवड पोलीस ठाणे : अनिल तुकाराम मोहिते आणि इतर 10
2 हिंजवडी पोलीस ठाणे : हिरा बहादुर हमाल आणि इतर 07
3 चाकण पोलीस ठाणे : शुभम सुरेश म्हस्के आणि इतर 17
4 निगडी पोलीस ठाणे : दत्ता बाबु सुर्यवंशी आणि इतर 3
5 चिंचवड पोलीस ठाणे : आकाश राजू काळे आणि इतर 6
6 पिंपरी पोलीस ठाणे : विशाल विष्णू लष्करे आणि इतर 30
7 तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे : कुणाल धिरज ठाकुर आणि इतर 29
तसेच
निगडी पोलीस ठाणे : अक्षय मुकुंद गायकवाड यास एम. पी. डी. ए. अंतर्गत स्थानबध्द करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– पोलिसांना मारहाण करुन फरार झालेल्या आरोपींना जेरबंद करण्यात यश; कामशेत पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी
– चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत मोठा ट्विस्ट! शंकर जगताप यांनीही भरला उमेदवारी अर्ज, लगेच वाचा