व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ लोकसभा निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज, 18 हजार मनुष्यबळाची नियुक्ती, 114 पथकांची स्थापना, वाचा अधिक

लोकसभा निवडणूका शांततेत व सुरळीत तसेच निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी केले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 17, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Maval Lok Sabha Deepak Singla

Photo Courtesy : FB / DIO Pune


लोकसभा निवडणूका शांततेत व सुरळीत तसेच निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी केले. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मावळचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले, समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मत खराडे, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी, सहायक पोलिस आयुक्त राजू मोरे, माध्यम कक्षाचे समन्वयक शिवप्रसाद बागडी यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

निवडणूक प्रक्रीया आणि व्यवस्थापनाबद्दल माहिती देवून सिंगला म्हणाले, मावळ लोकसभा मतदार संघाची निवडणूक चौथ्या टप्प्यात होत असून 18 एप्रिल रोजी निवडणूकीची सुचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्या दिवसापासून नामनिर्देशन पत्रे स्विकारण्यात येतील. मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक कार्यालय 7 वा मजला, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, आकुर्डी या ठिकाणी ही नामनिर्देशन पत्रे स्विकृत केली जातील. 25 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची अंतिम तारीख असून 26 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाईल तर 29 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल. 13 मे रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून 4 जून रोजी मतमोजणी प्रक्रीया पार पडेल.

निवडणूकीच्या अनुषंगाने प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. सुमारे 18 हजार मनुष्यबळाची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी करण्यात आली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्याच्यादृष्टीने समन्वयासाठी 16 नोडल अधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रीयेच्या प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्षांना माहिती देऊन अवगत करण्यात येणार आहे. ( Administration Ready For Maval Lok Sabha Information by Election Returning Officer Deepak Singla )

निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी विविध पथकांची निर्मिती करण्यात आली असून त्यासाठी मावळ लोकसभा मतदार संघात येणाऱ्या पनवेल, कर्जत, उरण, मावळ, पिंपरी, चिंचवड अशा 6 विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 114 पथके स्थापन करण्यात आलेली आहेत. दिव्यांग, वयोवृद्ध नागरिकांना मतदान करण्यासाठी आवश्यक सुविधा पुरविल्या जाणार आहेत. मतदान केंद्रावर देखील आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत. संपर्क व्यवस्थेत बाधा येणार नाही याबाबत दक्षता घेण्यात आली आहे. याव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध प्रशिक्षणाची, मतदान यंत्रे, मतदार संख्या इत्यादी बाबतची माहिती सिंगला यांनी दिली.

अधिक वाचा –
– हिंदू धर्मियांसाठी महत्वाच्या असलेल्या सणांच्या दिवशी लोणावळा विभागातील मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याची मागणी । Lonavala News
– ‘महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांप्रमाणेच नेत्यांवर देखील कारवाई होईल’ – बाळा भेगडे । Maval Lok Sabha
– ‘समोर कोण उमेदवार माहिती नाही’, बारणेंच्या या विधानाचा वाघेरेंकडून खरपूस समाचार, ‘मतदार बारणेंच्या अहंकाराचा अंत करतील’

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

‘मी आयुष्यात पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मतदान करणार आहे’ – बापूसाहेब भेगडे । Maval Lok Sabha

Next Post

आमदार सुनिल शेळके यांच्या आजी लक्ष्मीबाई शेळके यांचे वृद्धापकाळाने निधन । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MLA Sunil Shelke Grandmother Passed Away

आमदार सुनिल शेळके यांच्या आजी लक्ष्मीबाई शेळके यांचे वृद्धापकाळाने निधन । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
Demand to reroute power line obstructingthe paragliding hill in Kamshet Maval

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी

June 25, 2026
Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
MLA Sunil Shelke

पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव

June 24, 2026
Rain begins in the Pavana Dam area paddy seedlings get new lease of life bringing relief to farmers

Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला

June 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.