मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2 संशोधन व विकास अंतर्गत मावळ तालुक्यातील सुमारे 72 कोटी 38 लक्ष निधीतील विकासकामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आमदार सुनिल शेळके यांच्या पाठपुराव्यातून हा निधी आणि प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून ग्रामीण भागातील रस्ते विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याबद्दल आमदार सुनिल शेळके यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मावळच्या जनतेच्या वतीने आभार आहेत. ( Administrative approval for road development works in rural areas of Maval taluka )
रस्ते विकास कामाचे नाव आणि उपलब्ध निधी :
1. कोथुर्णे ते वाघजाई वस्ती ते मळवंडी ठूले रस्ता करणे – 8 कोटी 38 लक्ष,
2. राममा-04 – वळक ते सांगिसे रस्ता करणे – 10 कोटी 4 लक्ष,
3. इजिमा-65 ते करंजगाव पाले ना.मा. उकसान रस्ता करणे – 10 कोटी 71 लक्ष,
4. इजिमा-68 ते राजपुरी ते मंगरूळ रस्ता करणे – 6 कोटी 70 लक्ष,
5. चांदखेड ते कासारसाई रस्ता करणे – 7 कोटी 69 लक्ष,
6. मळवली ते सदापुर ते राममा -04 रस्ता करणे – 9 कोटी 23 लक्ष,
7. वाघेश्वर कादव ते ग्रामा-28 चोरघेवस्ती ते शिंदेवस्ती रस्ता करणे – 7 कोटी 50 लक्ष,
8. प्रजिमा-157 ते चांदखेड रस्ता करणे – 5 कोटी 20 लक्ष,
9. इजिमा-65 ते करंजगाव ते वादरमाळ रस्ता करणे – 3 कोटी 29 लक्ष,
10. प्रजिमा-26 काले कॉलनी ते दत्तवाडी-ढालेवाडी ते मालेवाडी रस्ता करणे – 3 कोटी 59 लक्ष,
एकूण 72 कोटी 38 लाख निधी
मावळ तालुक्यातील सुमारे 72 कोटी 38 लक्ष निधीतील विकासकामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा – 2 संशोधन व विकास अंतर्गत ही कामे होणार आहेत.
View this post on Instagram
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकाराने तळेगाव दाभाडे शहरात नवीन मतदार नोंदणी अभियान
– तिहेरी हत्याकांड प्रकरण : अखेर ‘त्या’ तिन्ही मायलेकरांचा शोध थांबवला, नदीची पाणीपातळी वाढल्याने निर्णय । Talegaon News
– पावसाचा कहर ! किल्ले राजमाची मार्गावर दरड कोसळली, किल्ले लोहगडाच्या रस्त्याला तडे । Maval News