Dainik Maval News : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताह सोमवार, दिनांक २० एप्रिल ते २६ एप्रिल २०२५ या कालावधीत करण्यात येणार असल्याची माहिती स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) तळेगाव स्टेशन, सिध्दीविनायक प्रतिष्ठान अध्यक्ष गणेश मोहनराव काकडे यांनी दिली.
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात वर्षातून दोन वेळा म्हणजेच श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी व श्री दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ साजरे केले जातात. सप्ताह कालावधीत आपल्या केंद्रातील सर्व सामान्य सेवेकऱ्यांनी स्वतः स्वयंपूर्ण यज्ञ सप्ताहात भाग घ्यावा यासाठी अखंड नामजप यज्ञ सप्ताह आयोजित केला आहे.
तसेच यामध्ये सामुदायिक गुरुचरित्र वाचन दोन बॅचमधून सकाळी ५:३० ते ७:३० आणि सकाळी ८:१५ ते १०:३० होणार आहे. तसेच सप्ताह काळात ग्रामअभियान अंतर्गत वैयक्तिक, सामाजिक अडचणी, पितृदोष, कुलदेवतादोष, वास्तुदोष, ग्रहपीडा, नोकरी, व्यापार उद्योग, व्यसन, शिक्षण, शेती, आरोग्य, विवाह यांसंबंधित समस्यांवर विनामुल्य मार्गदर्शन मिळणार आहे.
श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर समर्थनगर, डी. पी. रोड तळेगाव दाभाडे (स्टेशन) येथे हे कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्व भाविकांनी, सेवेकऱ्यांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन गणेश काकडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 27वा गाळप हंगाम संपन्न ; 4 लाख 64 हजार पोती साखरेचे उत्पादन
– ‘मी 1 लाख 10 हजार मतांनी निवडून आलो, त्यामुळे आता 1 लाख 10 हजार झाडे लावणार’ ; आमदार शेळके यांचा संकल्प
– लोहगड किल्ल्याच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून अडीच कोटींचा निधी ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती । Lohgad Fort