शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. पुणे जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्यांमध्ये मावळमधील उपतालुका प्रमुख अमित कुंभार यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवत नवी जबाबदारी दिल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. ( Alandi – Talegaon Municipality Election Coordinator Amit Kumbhar Shiv Sena Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळचे उपतालुका प्रमुख अमित कुंभार यांच्यावर उद्धव ठाकरेंनी दाखवला विश्वास...
शिवसेनेत पडलेली फूट, त्यानंतर पक्षावर आलेले संकट अशा कसोटीच्या काळात मावळ तालुक्यातील अनेक शिवसैनिक उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे गटात गेले. खासदार श्रीरंग बारणे यांच्यासोबतही अनेक कार्यकर्ते एकनाथ शिंदेसोबत गेले. मात्र, मावळ तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरेंसोबत ठाम राहिले. यापैकीच एक नाव म्हणजे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख अमित कुंभार .
राजकीय जीवनाच्या पहिल्या पायरीपासून एक पक्ष, एक नेता, एक निष्ठा या तत्वाद्वारे अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेपासून अमित कुंभार हे शिवसेनेसोबत आणि ठाकरे कुटुंबासोबत ठाम राहिले आहेत. त्यामुळेच शिवसेनेचे शाखाप्रमुख ते उपतालुकाप्रमुख अशी त्यांनी मजल मारली आणि आता पक्षाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवून त्यांना ” आळंदी – तळेगाव नगरपालिका निवडणूक समन्वयक ” म्हणून नियुक्ती करत त्यांच्यावर नवी जबाबदारी दिली आहे.
हेही वाचा – उद्धव ठाकरेंकडून पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर, मावळमध्येही अनेक बदल
पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत आळंदी – तळेगाव नगरपालिका शिवसेनेची म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ताब्यात राहील, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास अमित कुंभार यांनी यावेळी व्यक्त केला.
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळकेंची मावळमधील अतिदुर्गम गावात भेट, कळकराई ग्रामस्थांची दिवाळी केली गोड
– Video : ताजे येथील बाल वारकरी शिक्षण शिबिरात 100 बाल वारकऱ्यांचा सहभाग