श्रीविठ्ठल मंदिर संस्थान – तळेगांव दाभाडे आणि नगरसेवक संतोषभाऊ भेगडे स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षी श्री अलंकापुरी पंचक्रोशी पायी प्रदक्षिणा सोहळ्याचे आयोजन केले आहे. अलंकापुरीच्या पंचक्रोशीमध्ये सकळ ऋषिमुनिजन व अखिल देवता वन, वृक्ष, वल्ली, पक्षी, मृत्तिका, पाषाण व खड्यांच्या रूपाने राहतात व कोट्यावधी पुण्यपावन तीर्थांचा रहिवास या पंचक्रोशीमध्ये आहे. अशी अलंकापुरीची अत्यंत दैदीप्यमान व पुण्यपावन त्रिभुवनैकपवित्र पंचक्रोशी आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
श्री ज्ञानराजांच्या समाधी सोहळ्याच्या प्रसंगी जे साधु-संत, ऋषि-मुनी व देव-देवता, गण-गंधर्व, यक्ष- किन्नर हे पंढरपूरहून आले असता, यांच्या वास्तव्याने ही पंचक्रोशीची भुमी व्याप्त झाली होती. ।। पंढरीचा पोहा आला अलंकापुरी । पंचक्रोशावरी साधुजन ।। तेंव्हा नामदेव महाराजांनी व इतर साधु-संत आणि देव-देवतांनी जी प्रदक्षिणा केली तीच ही अलंकापुरी पंचक्रोशी प्रदक्षिणा होय. अतः या पुण्यपावन पंचक्रोशी प्रदक्षिणेचे आयोजन श्री कैवल्यसम्राट चक्रवर्ती ज्ञानराज माऊलींच्या सत्तेतुन व हैबतबाबांच्या प्रेरणेने होत आहे.
मार्गशीर्ष वद्य 4, रविवार दि. 31/12/2023 श्री विठ्ठल मंदिर, शाळा चौक, तळेगांव दाभाडे – मुक्काम व पालखी स्वागत – गावतळ्याजवळ भोई आळी दु. 3:30 वा. स्वागत झाल्यावर पायी प्रदक्षिणा सोहळयास सुरुवात. तळेगाव ग्रामप्रदक्षिणा मार्ग मावलाई मंदिर तळ्याकाठाने – भोई आळी – खडक मोहल्ला – बाजारपेठ – राजेंद्र चौक तेली आळी – मारुती मंदिर – जिजामाता चौक – सुभाष चौक – माळी आळी दाभाडे आळी – श्री बनेश्वर मंदिर चौक – श्री डोळसनाथ महाराज मंदिर – कुंभार वाडा मार्गे भेगडे आळी गणपती चौक – श्री विठ्ठल मंदिर मुक्काम.
कीर्तन : सायं. 7 ते 9 वा.
ह.भ.प. गु.श्री. ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली)
महापुजा व स्वागत हस्ते,
नगरसेवक संतोष मारुती (छबुराव) भेगडे
सर्व तळेगांवकर नागरिकांनी, भाविकांनी व वारकरी बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी होऊन सर्व श्रवणाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रस्थान : सोमवार दि. 1/1/2024 रोजी श्रीविठ्ठल मंदिर गणपती चौक चावडी चौक – बनेश्वर मंदिर – समर्थनगर मार्गे माळवाडी मार्गस्थ. – राजवाडा – श्री डोळसनाथ मंदिर ( Alankapuri Panchkroshi Pradakshina Ceremony Organized By vitthal Mandir Sansthan Talegaon Dabhade )
अधिक वाचा –
– खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आज वडगावात 1 कोटी 10 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन
– हॉटेल, चायनीज सेंटरमध्ये अवैधरित्या दारू विकणाऱ्यांची आता खैर नाही! वडगाव पोलिसांची 3 ठिकाणी कारवाई
– मावळ लोकसभा लढवण्यासाठी अजितदादांचा ‘विश्वासू नेता’ राष्ट्रवादी सोडणार? ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? वाचा सविस्तर