मावळ तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यातही लोणावळा विभागात मान्सून जोरदार बरसत आहे. पावसाचा जोर वाढल्याने ओढे, ओहोळ, नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर इंद्रायणीतील जलप्रवाह देखील वाढला आहे. परंतू यामुळे कार्ला – मळवली मार्गावरील इंद्रायणी नदीपात्रात नव्या पुलाचे बांधकाम सुरू असल्याने बांधलेला पर्यायी साकव पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे येथील गावांतील नागरिकांचे दळणवळण थांबले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
रविवारी दुपारच्या सुमारास कार्ला मळवली मार्गावरील पर्यायी साकव पाण्याखाली गेला. त्यामुळे येथील चार पाच गावांचा संपर्क काहीवेळ तुटला होता. तर दळणवळण पुर्णपणे थांबले होते. मागील अनेक महिन्यांपासून या नव्या पुलाचे काम सुरू आहे. अत्यंत संथपणे सुरू असलेल्या या कामाबाबत स्थानिकांनी अनेकवेळा आवाज उठवला परंतू त्यातून काहीही साध्य झाल्याचे दिसत नाही, कारण ऐन पावसात स्थानिकांची व्हायची ती अडचण झालीच. ( alternative bridge over Indrayani river on Karla Malvali route went under water )
सोमवारी सकाळी पाणी ओसरल्यानंतर दुचाकी आणि लहान कारची वाहतूक पुन्हा पर्यायी साकव वरून सुरू झाली परंतू, पुलाचा काही भाग वाहून गेल्याने अवजड वाहने काही ये-जा करू शकत नाहीयेत.
अधिक वाचा –
– BREAKING : लोणावळ्यातील भुशी डॅम जवळील धबधब्याखाली पुण्यातील एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले
– पर्यटकांसाठी आनंदाची बातमी ! लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो
– माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावणारे एकनाथ शिंदे पहिले मुख्यमंत्री, फुगडी खेळली, इंद्रायणी स्वच्छतेचे दिले वचन