पवनानगर येथील पवना विद्या मंदिर शाळेतील इयत्ता दहावीच्या 2009-10 वर्षातील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला. पवना विद्या मंदिर विद्यालयात एकाच बाकावर बसलेले परंतु सध्या वेगवेगळ्या दिशेने वाटचाल करत असलेले हे विद्यार्थी तब्बल 14 वर्षांनंतर एकत्र आले होते. आयुष्यात वेगवेगळ्या वाटेवर मार्गक्रमण करत असलेले सर्व शालेय जीवनातील सवंगडी मित्र – मैत्रिणी दहावी ‘ब’ बॅचच्या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने रविवारी (दि. 23) एकत्र आले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
14 वर्षानंतर पुन्हा शाळेच्या प्रांगणात जमलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने प्रत्येक क्षणाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. यावेळी विद्यार्थ्यांकडून ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश देत वृक्षारोपण करण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच माजी विद्यार्थ्यांकडून 60 झाडे लावण्यात आली.
यावेळी पवना विद्या मंदिर शाळेचे शिक्षक बबन तांबे, संजय हुलावळे, लक्ष्मण मकर, महादेव थोरात, धनंजय खाडे, श्रद्धा मोहोळ आणि मोहिनी ढोरे यांंचा विद्यार्थांंनी सन्मान केला. सर्व शिक्षकानी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच स्नेह संमेलनात आपल्या अनेक आठवणींना उजाळा देत शालेय आठवणी जागृत केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण ओझरकर, आभार राहुल मोहोळ यांनी मानले. कार्यक्रमासाठी अमेश पडवळ, मंगेश शेळके, निलम पडवळ, सुभाष भोते, पूजा सांगडे यांनी विशेष प्रयत्न केले. पवना विद्या मंदिर विद्यालयतील 10 वी ब तुकडीचे सर्व विद्यार्थी, माजी विद्यार्थी उपस्थित होते. ( Alumni Gathering at Pavana Vidya Mandir School Pavananagar )
अधिक वाचा –
– ‘I Nilesh Lanke..’ कमालच झाली ! निलेश लंकेंनी थेट इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ, सुजय विखेंना कृतीतून प्रत्युत्तर – पाहा Video
– येळसे गावात भात लागवडीस सुरूवात, मावळ कृषि विभागाच्या कृषि संजिवनी मोहिमेला यश । Maval News
– ‘आम्ही इथले भाई…’ असे म्हणत तळेगाव शहरात गोळीबार करणाऱ्या गुंडांना नाशिकमधून अटक, 7 गावठी पिस्तूल जप्त । Talegaon Crime