सिमेंटची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकचा आज (शुक्रवार, 23 डिसेंबर) रोजी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला. खोपोली एक्झिट पॉइंटजवळ ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि काँक्रिट बॅरिकेट्सला ठोकर मारत हा ट्रक रस्त्यावर पलटी झाला. यात ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून सूर्यकांत कांबळे (रा. कर्नाटक) असे मृत चालकाचे नाव आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
View this post on Instagram
ट्रकचा अपघात झाल्यानंतर ट्रकमधील सिमेंट साधारण शंभर फूट परिसरात पसरले होते. तसेच रस्त्यावर उलटण्यापूर्वी सिमेंट काँक्रिटसह ट्रकने आणखीन एका ट्रकला जोरात धडक दिली होती. आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, वाहतूक पोलीस बोरघाट, लोकमान्य आरोग्य सेवा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, AFCONS ची यंत्रणा, आर. टी. ओ. आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य यांनी वेळीच मदतकार्य करुन परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक सुरळीत केली. सदर अपघात खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाला असून खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी पुढील तपास करत आहे. ( An accident involving a truck carrying cement at the Khopoli exit point on the Mumbai Pune Expressway )
अधिक वाचा –
– पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना : मंत्री शंभूराज देसाई
– मोठी बातमी! भारतीय लष्कराच्या ट्रकचा सिक्कीममध्ये भीषण अपघात, 16 जवान शहीद