अज्ञात वाहनाच्या धडकेने एका अनोळखी वाटसरूचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. 9 जानेवारी) रोजी रात्री घडली. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी माहिती दिली आहे. मंगळवार, दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास मौजे कामशेत (ता. मावळ) गावच्या हद्दीत जुण्या पुणे – मुंबई हायवेवर मुंबई लेनवर अजय ढाब्या समोर हा अपघात घडला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पायी चालत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीला (अंदाजे वय 30 वर्ष) (नाव पत्ता माहीत नाही) कोणत्या तरी अज्ञात वाहनाने धडक दिली. सदर अपघातात अनोळखी व्यक्ती गंभीररित्या जखमी होऊन उपचारादरम्यान तो मयत झाला आहे. सदर अनोळखी मृत व्यक्ती हा वीटभट्टी कामगार किंवा बिगारी कामगार असावा, अशी शंका पोलिसांना आहे. तरीही सदर अनोळखी व्यक्तीबाबत कुणाला काही माहिती असल्यास किंवा त्याचे नातेवाईकांचा किंवा वारसाचा शोध लागल्यास कामशेत पोलीस स्टेशनशी संपर्क करावा असे आवाहन पोलीस हवालदार जे. ए.दिक्षीत यांनी केले आहे. ( an unidentified passerby died after being hit by an unknown vehicle near Kamshet )
अधिक वाचा –
– ‘व्हर्टिव्ह’तर्फे चाकण भागात नवीन उत्पादन सुविधेचे उद्घाटन! उद्योगाप्रती वचनबद्धता मजबूत करत ‘मेक इन इंडिया’ अभियानाला समर्थन
– भटके-विमुक्त समाजासाठी शासनाचा पुढाकार; शिधापत्रिका वितरणासाठी दिनांक 15 जानेवारी ते 14 मार्चपर्यंत विशेष मोहिम
– ‘मुलाला नोकरीला लावतो’ असे सांगत बापाची 5 लाखाची आर्थिक फसवणूक; तळेगाव दाभाडे येथील धक्कादायक प्रकार । Maval Crime