व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, April 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा ; मावळ पोल्ट्री योद्धा संघटनेकडून राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत

महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे, ज्याने पशुपालन व्यवसायास कृषी व्यवसायाचा दर्जा दिला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 17, 2025
in महाराष्ट्र, ग्रामीण, लोकल, शहर
Animal husbandry business to be given agricultural business status

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पशुपालन व्यवसायास ‘कृषी व्यवसायाचा’ दर्जा देण्यात आला आहे. राज्यातील पशुपालन व्यवसायाला मोठा दिलासा देणारा हा निर्णय असून असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

  • दरम्यान, राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी व्यवसायाचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, या निर्णयाचे मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेने स्वागत केले आहे. यामुळे पोल्ट्रीसह इतर पशुसंवर्धन व्यवसायाला मोठा आधार मिळणार असून तो शेतकरी व पशुपालकांच्या दृष्टीने अत्यंत दिलासादायक ठरणार असल्याचे मत संघटनेचे अध्यक्ष एकनाथ गाडे यांनी व्यक्त केले.

पशुपालन व्यवसायास कृषी व्यवसायाचा दर्जा देण्याच्या निर्णयाची पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत नुकतीच घोषणा केली. पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी हा क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे ७६.४१ लक्ष पशुपालक कुटुंबांना होईल. या निर्णयामुळे पशुजन्य उत्पादनातून सुमारे ७,७०० कोटी रुपये इतकी वाढ अभिप्रेत आहे, असे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले,

महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे, ज्याने पशुपालन व्यवसायास कृषी व्यवसायाचा दर्जा दिला आहे. यामुळे पोल्ट्री व्यवसायासही कृषी क्षेत्रातील सवलतींचा लाभ मिळणार असून, यामध्ये वीज दर आकारणी कृषी दराप्रमाणे, ग्रामपंचायत करामध्ये सवलत, कर्जावरील व्याजदरात सवलत तसेच सौरऊर्जेवरील प्रकल्पांसाठी अनुदान यांचा समावेश आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील पोल्ट्री व्यवसायास नवा श्वास मिळेल, रोजगाराच्या संधी वाढतील आणि पशुपालकांचे आर्थिक बळकटीकरण होईल, असेही गाडे यांनी नमूद केले. यावेळी संघटनेचे सचिव सोनबा गोपाळे यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबवले जात आहे, ही गोष्ट उत्साहवर्धक आहे.”

कार्याध्यक्ष सुभाष केदारी म्हणाले, “पोल्ट्री व्यवसायास कृषी दर्जा मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना व्यवसायाच्या नव्या संधी मिळतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.” संघटनेचे राज्याचे अध्यक्ष अनिल खामकर व सचिव विलास साळवी यांनी संघटितपणे दिलेल्या लढ्याबद्दल मावळ तालुका संघटनेने आभार व्यक्त केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सोमाटणे, वरसोली येथील टोलनाके बंद होणार नाही? सरकारच्या उत्तरामुळे नागरिकांमध्ये मोठी निराशा, आमदार शेळकेंच्या प्रश्नामुळे वास्तव उघड
– पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर – वाचा सविस्तर
– तळेगाव-चाकण रस्त्याची दूरवस्था ; आमदार सुनील शेळके प्रचंड आक्रमक, तातडीने खड्डे बुजविण्याची सरकारकडे मागणी


Previous Post

तळेगाव दाभाडे शहरातील अनेक भागात भटक्या कुत्र्यांची दहशत ; भटक्या श्वानांची वाढती संख्या चिंतेची बाब । Talegaon Dabhade

Next Post

उर्से घरफोडी प्रकरणातील आरोपी जेरबंद, पंचवीस लाखांचे दागिने व मुद्देमाल हस्तगत । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

उर्से घरफोडी प्रकरणातील आरोपी जेरबंद, पंचवीस लाखांचे दागिने व मुद्देमाल हस्तगत । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Massive fire breaks out at scrap warehouse along old Pune-Mumbai highway in Kamshet Maval

कामशेत येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या भंगार गोदामाला भीषण आग ; लाखोंचा माल भस्मसात

April 7, 2026
Tragic incident An 80-year-old man died after falling into a well in Takve Budruk Maval

दुर्देवी घटना ! टाकवे बुद्रुक येथे विहिरीत पडून ८० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

April 7, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी राज्यातील १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत

April 7, 2026
Two new metro projects should be approved in Maval taluka Bala Bhegde demands from CM Devendra Fadanvis

मावळ तालुक्यात दोन नवीन मेट्रो प्रकल्पांना मंजूरी द्यावी ; बाळा भेगडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

April 7, 2026
Big relief for Talegaon Dabhade People on water issue Inauguration of water purification center at Yashwant nagar

तळेगावकरांना पाणीप्रश्नावर मोठा दिलासा ; यशवंतनगर येथील ३ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण

April 6, 2026
Lonavala Smart City development plan Focus on AI based CCTV road beautification traffic management

लोणावळा शहराचा ‘स्मार्ट सिटी’ धर्तीवर विकास आराखड्यास गती ; ‘एआय’ आधारित CCTV, रस्ते सुशोभीकरण व ट्रॅफिक व्यवस्थापनावर भर

April 6, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.