Dainik Maval News : आगामी पाच वर्षांसाठी मावळ तालुक्यातील 93 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत बुधवारी (दि. 23 एप्रिल) वडगाव येथील भेगडे लॉन्स मंगल कार्यालयात काढण्यात आली.
मावळ तालुक्यात एकूण 103 ग्रामपंचायती असून त्यांच्या सरपंचपदासाठी 5 मार्च 2025 ते 4 मार्च 2030 या कालावधीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. तालुक्यातील 103 ग्रामपंचायतींपैकी आदिवासी क्षेत्रातील दहा ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी कायमस्वरूपी राखीव असून त्यांचा सोडतीमध्ये समावेश नव्हता. उर्वरित 93 ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.
यावेळी तहसीलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, नायब तहसीलदार गणेश तळेकर, महसूल नायब तहसीलदार अविनाश पिसाळ, मंडल अधिकारी वडगाव मावळ रमेश कदम, मंडल अधिकारी खडकाळा सुरेश जगताप, वडगावचे तलाठी विजय साळुंके, महसूल सहाय्यक बबिता सोनवणे तसेच विविध गावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रमपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- एकूण 93 ग्रामपंचायतीपैकी 9 ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी, 6 ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी, 25 ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) तर 53 ग्रामपंचायती सर्वसाधारण वर्गासाठी लहान विद्यार्थ्याच्या हस्ते चिठ्ठया टाकून आरक्षित करण्यात आल्या. सर्वसाधारण 53 ग्रामपंचायतींमधून महिला व पुरुषांसाठी आरक्षण काढण्यात आले आहे.
सरपंच पदाचे आरक्षण आणि ग्रामपंचायत :
अनुसूचित जातीसाठी राखीव (9) – स्त्री राखीव (5) तुंग, कान्हे, ओवळे, शिळींब, शिवणे आणि (4) आंबी, कुजगाव पमा, नाणे, आढले बुद्रुक
अनुसूचित जमातीसाठी राखीव (6) – स्त्री राखीव (3) करूंज, जांभूळ, जांबवडे आणि (3) डोंगरगाव, मळवंडी ठुले, देवले.
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव (ओबीसी) (25) – स्त्री राखीव (13) सोमाटणे, कुरवंडे, सांगवडे, खडकाळा, मोरवे, शिरगाव, वारू, वरसोली, पुसाणे, औंढे खुर्द, बऊर, खांडशी, पाटण आणि (12) शिळाटणे, करंजगाव, कांब्रे (नामा), मळवली, यलघोल, सांगीसे, वराळे, दारुंब्रे, पाचाणे, भाजे, धामणे, मळवंडी ढोरे.
सर्वसाधारण वर्गासाठी (53) – सर्वसाधारण स्त्री (27) सुदुंबरे, साळुंब्रे, सुदवडी, दिवड, चिखलसे, गहुंजे, कल्हाट, साते, आढले खुर्द, डाहुली, इंदोरी,निगडे, टाकवे बुद्रुक, थुगाव, शिवली, गोवित्री, उर्से, कुसगाव खुर्द, महागाव, घोणशेत, कोथुर्णे आणि सर्वसाधारण (26) आजिवली, ठाकूरसाई, कान्हे, लोहगड, आंबळे, नवलाख उंबरे, वेहेरगाव, ताजे, कार्ला, तिकोना, साई, आढे, परंदवडी, कुसगाव बुद्रुक, आपटी, उकसान, चांदखेड, भोयरे, गोडुंब्रे, येळसे, बेबडओहळ, कोंडीवडे (आ मा), माळवाडी, वाकसई, मुंढावरे आंबेगाव
पुढील गावांमध्ये असणार महिलाराज
आरक्षण सोडतीनंतर उधेवाडी, इंगळून, कशाळ, कुसवली, खांडी, तुंग, कान्हे, ओवळे, शिळीम, शिवणे, करूंज, जांभूळ, जांबवडे, सोमाटणे, कुरवंडे, सांगवडे, खडकाळा, मोरवे, शिरगाव, वारू, वरसोली, पुसाणे, औंढे खुर्द, बऊर, खांडशी, पाटण, सुदुंबरे, साळुंब्रे, सुदवडी, दिवड, चिखलसे, गहुंजे, कल्हाट, साते, आढले खुर्द, डाहुली, इंदोरी, निगडे, टाकवे बुद्रुक, थुगाव, शिवली, गोवित्री, उर्से, कुसगाव खुर्द, महागाव, घोणशेत, कोथुर्णे, केवरे, काले, टाकवे खुर्द, नाणोली तर्फे चाकण, ओझर्डे या 53 ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज असणार हे स्पष्ट झाले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार